ट्रेंडिंग
परळी वैद्यनाथ मंदिराच्या नवीन दर्शन मंडपातच शिजवले मांसाहारी अन्न, घटना कॅमेऱ्यात कैद
परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी नियोजित दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवले आहे.
Beed : परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची बांधकामे सुरु आहेत. मात्र वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी नियोजित दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला आहे.
मंदिर परिसरात कामे करतांना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा वारंवार सुचना लोकप्रतिनिधी देत असतात. मात्र, तरीही दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत सबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते. आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच मांसाहार शिजवल्याचा प्रकार पुढे आला आहे.
वैद्यनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक
परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती आहे. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरुपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या आणि भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करुन दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 18 वर्षे लागली. सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता. हे तीर्थक्षेत्र अहिल्या देवीला अत्यंत प्रिय होते असंही म्हणतात.
महत्वाच्या बातम्या:
Pankaja Munde : परळीच्या विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी, नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे