एक्स्प्लोर

नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा

नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर संक्रात येणार आहे. कारण नायलॉन मांजाने पतंग उडविणारे मुलं, पालक आणि विक्रेत्यांवर पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल होणारे. 

Nashik : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र असे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापर नागरिकांच्या जिवावर उठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. परिणामी या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करूनही छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहे. अशातच आता नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर संक्रात येणार आहे. कारण नायलॉन मांजाने पतंग उडविणारे मुलं, पालक आणि विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांकडून 'सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न' करण्याचा गुन्हा दाखल होणार आहे. 

नाशकात आत्तापर्यंत 50 गुन्हे, 7 पालकांसह 28 जणांना अटक 

नाशिक पोलिसांकडून पहिल्यांदाच नायलॉन मांज्याचा वापरकर्ते आणि विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यानं त्यांच्या पालकांवर कारवाई केली जात आहे. नाशकात आत्तापर्यंत विक्रेत्यांसह 50 गुन्हे दाखल झाले असून 28 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात 7 पालकांनाही अटक करण्यात आली आहे. संक्रातीच्या पूर्व संध्येला नाशिक पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलीस मैदानात सज्ज झाले आहे. 

पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांकडून ड्रोनद्वारे विशेष लक्ष 

मकरसंक्रांतीला नागपुरात पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार आहे. पतंगबाजी करताना अनेक लोक नायलॉन मांजाचा वापर करतात आणि त्यामुळे वाहन चालक तसेच पक्षी जखमी होण्याच्या अनेक घटना घडतात. अशाच दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा पतंगबाजांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या अंतर्गतच घरांच्या छतावरून तसेच खुल्या मैदानातून पतंगबाजी करणारे नायलॉन मांजाचा वापर तर करत नाही ना, हुल्लडबाजी तर करत नाही ना, यावर नजर ठेवण्यासाठी नागपूर पोलीस ड्रोनचा वापर करत आहे.

या कारवाईमध्ये जर कोणी ही पतंगबाज नायलॉन मांजा वापर करताना आढळले तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असून रीतसर गुन्हे दाखल केले जाणार आहे. अशी माहिती नागपूर पोलिसांच्या जोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.

नागपूर पोलिसांकडून सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक 

शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होऊ नये आणि त्याचा कोणी वापर करू नये यासाठी नागपूर पोलिसांनी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक ही तयार केले असून ते पतंगबाजांवर करडी नजर ठेवणार आहे. एवढेच नाही तर पोलीस उदघोषणा प्रणालीद्वारे शहरातील विविध भागात नायलॉन मांजा वापरू नये असे आवाहन करत आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganpati Festival Train Booking : गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics : भाजपचं शतक, कुणाची विकेट? ठाकरेंच्या शिवसेनेत गळती, महायुतीत भरती Special Report
Devendra Fadanvis On Kumbh : कुंभमेळ्यासाठी विस्तारित रस्ते नेटवर्क, नाशिक रिंग रोड मंजूर - फडणवीस
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचे राजकीय निवृतीचे संकेत, 'आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबण्याची वेळ' - जाधव
ABP Majha Headlines : 08 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranjan Taware on Ajit Pawar : अजित पवारांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,रंजनकुमार तावरेंचा घणाघात!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganpati Festival Train Booking : गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Investment Idea : SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
Embed widget
OSZAR »