एक्स्प्लोर

बीडमध्ये CIIIT च्या कामाला वेग, 4 हजार चौ.मी जागा अन् निधीही मिळाला, अजितदादांच्या धडाकेबाज पुढाकाराचं होतंय कौतूक

बीडमधील युवकांचे भविष्यासाठी CIIIT हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. बीडच्या औद्योगिकीकरणासाठी आणि कौशल्यविकासासाठी हा टप्पा ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याच्या प्रतिक्रीया विविध स्तरांवरून व्यक्त होत आहे.

Beed: बीड जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या CIIIT प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज कार्यपध्दीमुळे MIDCच्या संचालक मंडळाने बीड औद्योगिक वसाहतीत फेज-3 मध्ये 4,000 चौ. मीटर जागा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा टेक्नॉलॉजीझच्या माध्यमातून 191 कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात येणार आहे. या पैकी 15% म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपये बीड जिल्हा प्रशासन उचलेल, तर उर्वरित निधी टाटा टेक्नॉलॉजी आणि तिच्या भागीदार संस्था उचरणार आहेत. या केंद्रात दरवर्षी सुमारे 7,000 युवकांना आधुनिक तांत्रिक आणि औद्योगिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

बीडच्या प्रशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार

सध्या भारतात उद्योग 4.0 म्हणजेच डिजिटल, ऑटोमेशन, AI आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर आधारित उत्पादन आणि सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. अशा काळात स्थानिक युवकांना या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आणि उद्योगांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी या प्रकारचं सेंटर अत्यंत आवश्यक मानलं जात आहे. CIIIT मध्ये CNC मशीन ऑपरेशन, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऑटोमेशन, IoT, डेटा अ‍ॅनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स यांसारख्या अद्ययावत कोर्सेसद्वारे प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षित युवकांना स्थानिक व राष्ट्रीय उद्योगांमध्ये थेट नोकरीच्या संधी मिळतील. तसेच, काही कोर्सेस नंतर युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचीही क्षमता प्राप्त होईल.

खर्चाचं गणित कसं?

प्रशिक्षणाचा खर्च पहिल्या 3 वर्षांसाठी टाटा टेक्नॉलॉजी उचलेल. त्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी आणि जिल्हा प्रशासन प्रत्येकी 50% प्रमाणे खर्च उचलणार आहेत. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यात उद्योगासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होईल, स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळेल, आणि स्थलांतरित होणाऱ्या युवकांची संख्या कमी होईल. 2025 च्या एप्रिल महिन्यात बीड दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी या CIIIT प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि टाटा टेक्नॉलॉजीला सहकार्याचं आवाहन केलं. कंपनीनेही सकारात्मक प्रतिसाद देत 191 कोटींच्या प्रकल्पाची तयारी दर्शवली.

बीडमध्ये राबवला जाणारा हा प्रकल्प ही केवळ रोजगार निर्मिती नव्हे, तर जिल्ह्याच्या औद्योगिक भवितव्यासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे. बीडमधील युवकांचे भविष्यासाठी CIIIT हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. बीडच्या औद्योगिकीकरणासाठी आणि कौशल्यविकासासाठी हा टप्पा ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याच्या प्रतिक्रीया विविध स्तरांवरून व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

Sonu Sood : लातूरच्या वृद्ध जोडप्याचा शेत नांगरतानाचा व्हिडीओ व्हायरल; सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाला, "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार? गप्प
महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार? गप्प
Sanjay Raut on Disha Salian: राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी, दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल
राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी, दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल
Disha Salian Case: पोलीस म्हणतात दिशा सालियनचा मृत्यू अपघाती, पण भाजपच्या राम कदमांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
पोलीस म्हणतात दिशा सालियनचा मृत्यू अपघाती, पण भाजपच्या राम कदमांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
Ola Uber Rapido नं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! गर्दीच्या वेळी दुप्पट भाडं आकारणार, सरकारच्या नव्या नियमावर प्रताप सरनाईक म्हणाले...
Ola Uber Rapido नं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गर्दीच्या वेळी दुप्पट भाडं आकारणार, सरकारच्या नव्या नियमावर प्रताप सरनाईक म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anjali Damania : धनंजय मुंडे सारख्या माणसाला महिलेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही
Sudhir Mungantiwar : फडणवीस सरकारला घेरले, कामकाज पत्रिकेवरून सवाल
Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2025 : ABP Majha : 12 PM
Palghar News : पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
Shiv Sena UBT Nashik : Mama Rajwade, Sunil Bagul यांची हकालपट्टी, Prathamesh Gite नवे महानगरप्रमुख

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार? गप्प
महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार? गप्प
Sanjay Raut on Disha Salian: राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी, दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल
राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी, दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल
Disha Salian Case: पोलीस म्हणतात दिशा सालियनचा मृत्यू अपघाती, पण भाजपच्या राम कदमांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
पोलीस म्हणतात दिशा सालियनचा मृत्यू अपघाती, पण भाजपच्या राम कदमांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
Ola Uber Rapido नं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! गर्दीच्या वेळी दुप्पट भाडं आकारणार, सरकारच्या नव्या नियमावर प्रताप सरनाईक म्हणाले...
Ola Uber Rapido नं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गर्दीच्या वेळी दुप्पट भाडं आकारणार, सरकारच्या नव्या नियमावर प्रताप सरनाईक म्हणाले...
पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकी सुद्धा महाराष्ट्रात येऊन फडवणीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजप प्रवेश करतील; संजय राऊतांचा घणाघाती प्रहार
पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकी सुद्धा महाराष्ट्रात येऊन फडवणीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजप प्रवेश करतील; संजय राऊतांचा घणाघाती प्रहार
Bihar Election: ही तर मतदान बंदी! निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
ही तर मतदान बंदी! निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
MNS Marathi Language: मोठी बातमी : मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट, मीरा भाईंदरमध्ये बंद, मारहाणीवरुन आक्रमक
मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट, मीरा भाईंदरमध्ये बंद, मारहाणीवरुन आक्रमक
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली!  पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
Embed widget
OSZAR »