पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकी सुद्धा महाराष्ट्रात येऊन फडवणीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजप प्रवेश करतील; संजय राऊतांचा घणाघाती प्रहार
Sanjay Raut on BJP: जे जे फरार आहेत ते भाजपमध्ये सामील होत आहेत, हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारला पाहिजे माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे आता तुम्ही काय करणार अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut on BJP: पहलगाममध्ये आमच्या आया बहिणीचं कुंकू पुसणारे अतिरेकी अजूनही सापडले नाहीत, ते जेव्हा सापडतील ते पाच ते सहा अतिरेकी महाराष्ट्रात येतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश करतील, ते अजून सापडलेले नसल्याने मला त्याची भीती वाटत असल्याचा घणाघाती प्रहार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. जे भाजपमध्ये गेले आहेत तेच भाजपचं कॅरेक्टर असल्याचा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले. सलीम कुत्ता प्रकरणावरून सुधाकर बडगुजरांसारख्या नेत्यावर देशद्रोहाचा सुद्धा आरोप करण्यात आला होता त्या सर्वांनी भाजप प्रवेश केला आहे. बँक घोटाळ्यातील संशयित असलेल्या माजी आमदार अपूर्व हिरे यांनी सुद्धा भाजप प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज भाजपवरती कडाडून हल्ला चालवला.
भाजप दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये घेऊ शकतो
ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष आता दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये घेऊ शकतो. चार दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. नाशिकमधील एक व्यक्ती समाज माध्यमांवर शिवसेना नेत्यांची बदनामी करते. ब्लॅकमेल केलं जातं त्या बदल्या त्या बदनामीच्या बदल्यामध्ये काही आर्थिक मागणी केली जाते. शिवसैनिकांनी जाऊन मग घरात घुसून धक्का बुक्की केली असे म्हणता तर ते भारतीय जनता पक्षांनं सुद्धा केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
फरार गुन्हेगार भाजपमध्ये सामील होत आहेत
त्यांनी पुढे सांगितले की, नेत्यांवर आरोप केल्यानंतर हे सर्व लोकांना अटकपूर्वक जामीनासाठी न्यायालयात जातात आणि चार दिवस पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी फरार होतात. पोलीस यासाठी प्रयत्न करत राहिले. अटकपूर्वक जामीन मिळवण्यासाठी फरार गुन्हेगार भाजपमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षात सामील होत आहेत. मात्र पोलिसांना माहिती मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली. सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका ठेवला होता ते सुद्धा भाजपमध्ये असल्याचं संजय राऊत म्हणाले. जे जे फरार आहेत ते भाजपमध्ये सामील होत आहेत, हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारला पाहिजे माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे आता तुम्ही काय करणार अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. भंपक पोलीस अधिकारी वर्दीचा अपमान करत असल्याची टीका सुद्धा राऊत यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या