मासिक पाळीत ही 5 योगासने महिलांनी केलीच पाहिजेत; पोट फुगण्यासह अस्वस्थतेवर ठरतील फायद्याची, डॉ. सांगतात...
हे सर्वज्ञात आहे की योग तुमच्या अवयवांची बळकटी वाढवितो, पेटके येणे आणि पाठदुखी कमी करतो आणि मासिक पाळी दरम्यान अधिक आराम देते.
Health: तुम्हाला माहित आहे का की नियमित योगासनांचा सराव केल्याने तुम्हाला मासिक पाळी संबंधीत समस्या तसेच वेदनांपासून दूर राहता येते. हार्मोन्स संतुलित होतात आणि मासिक पाळी दरम्यान आराम मिळतो. दर महिन्याला, अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पेटके येणे, मूड स्विंग्ज, थकवा किंवा झोपेचा त्रास जाणवतो. यामुळे दैनंदिन जीवन कठीण होऊ शकते. तुम्हाला माहित आहे का की योगाभ्यास केल्याने वेदना कमी करता येतात आणि स्ट्रेचिंगने तणाव कमी करता येतो. नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ हिमानी गुप्ता यांनी पाळीदरम्यान करण्याच्या व्यायामाविषयी मार्गदर्शन केलं आहे.
व्यायाम हा तुम्हाला मासिक पाळीच्या तक्रारींपासून दूर ठेवण्यास मदत करतो.जर तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर योगाभ्यासाची निवड करणे योग्य राहिल. हे सर्वज्ञात आहे की योग तुमच्या अवयवांची बळकटी वाढवितो, पेटके येणे आणि पाठदुखी कमी करतो आणि मासिक पाळी दरम्यान अधिक आराम देते.
ट्रेंडिंग
नियमित योग हार्मोन्स संतुलित करतात
जर तुम्ही नियमितपणे योग केला तर ते तुमचे हार्मोन्स संतुलित करतात, तुमची मासिक पाळी अधिक सुखकर करण्यास मदत करते. ते मूड स्विंग्सची समस्या दूर करते, तणाव कमी करते आणि तुम्हाला पुरेशी झोप घेण्यास मदत करते. योगामुळे रक्तप्रवाह आणि पचन सुधारते, त्यामुळे पोट फुगणे आणि अस्वस्थता कमी होते. यामुळे शारीरीक क्षमता, लवचिकता वाढते आणि तुम्हाला दर महिन्याला अधिक आरामदायी आणि संतुलित वाटण्यास मदत होते. ही अशी योगासने आहेत जी एक महिला तिच्या मासिक पाळीस आराम देण्याचा प्रयत्न करू शकते.
कोणती आसने ठरतील फायद्याची?
सुप्त बद्ध कोणासन : प्रथम, तुमच्या पाठीवर झोपा, तुमच्या पायांचे तळवे एकत्र आणा, गुडघे बाहेरच्या दिशेने खाली वाकवा. या योगासनांमुळे योगींच्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते, मज्जासंस्था बळकट होते.
झुकलेले वळण (जठर परिवर्तनासन): पाठीवर सरळ झोपणे. कमरेखाली एक लोड आडवा घेणे. दोन्ही हातांनी लोड व्यवस्थित घट्ट धरणे. जठर परिवर्तन व्यायामप्रकार करत असताना मानेवर, खांद्यावर किंवा कमरेवर चुकीचा ताण येऊ नये म्हणून कमरेखाली लोड दिला जातो. हे पचनक्रिया सुलभ करते आणि पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते.
विपरित करणी : विपरित क्रिया कशी करायची?१. भिंतीला चिटकून झोपा आणि दोन्ही पाय भिंतीवर ठेवून वर घ्या. ज्यामुळे "L" आकार तयार होते. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते आणि शरीराला योग्य विश्रांती मिळते. शरीराला आराम मिळतो आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते.
ब्रिज पोज (सेतू बंधासन): गुडघे वाकवून पाय नितंबांच्या जवळ आणा. श्वास घेताना, कंबर आणि नितंब वर उचला आणि ब्रिजसारखी (पुलासारखी) स्थिती तयार करा. खांदे आणि पाय जमिनीवर स्थिर ठेवा. काही वेळ या स्थितीत राहून श्वासोच्छ्वास सामान्य ठेवा. हळू हळू श्वास सोडत कंबर आणि नितंब जमिनीवर आणा. यामुळे तुमचे प्रजनन अवयवांचे आरोग्य आणि हार्मोनल संतुलन चांगले राहते.
धनुरासन : धनुरासन करण्यासाठी, पोटावर झोपून गुडघे वाकवून हाताने घोटे धरा आणि श्वास घेताना छाती आणि पाय जमिनीवरून वर उचला. तुमचे शरीर धनुष्य सारखे वाकलेले दिसेल. हे मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करतात.
लक्षात ठेवा, योग्य तंत्रांचा वापर करुन योगाभ्यास केला तर तुमच्या आरोग्यास भरपुर फायदे होतात. योग्याभ्यास करण्यापुर्वी तज्ञांची मदत घ्या व त्यांच्या सल्ल्यानुसार योगाभ्यास करा.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )