आयआयटी खरगपूरमध्ये अभिनयाला सुरुवात, 'Panchayat च्या सचिवजी'ला एका एपिसोडसाठी किती रुपये मिळतात?
web series : आयआयटी खरगपूरमध्ये अभिनयाला सुरुवात, 'Panchayat च्या सचिवजी'ला एका एपिसोडसाठी किती रुपये मिळतात?
web series : कोटा फॅक्टरीचे 'जीतू भैया' म्हणजेच जितेंद्र कुमार हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातो. 34 वर्षीय जितेंद्र 'पंचायत' या वेबसिरीजच्या चौथ्या सिझनमध्ये पुन्हा एकदा लोकप्रिय ‘सचिव-जी’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही सुपरहिट विनोदी आणि ग्रामीण जीवन दाखवणारी वेब सिरीज 24 जून रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. जितेंद्र कुमार अभिनेता म्हणून जरी लोकप्रिय झाले असले, तरी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते एक आयआयटीयन होता, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. अभिनयाबद्दलची त्यांची प्रचंड ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी इंजिनीअरिंगचा मार्ग सोडून दिला. आता आपण जितेंद्रच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर एक नजर टाकू..
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खैरथल या गावचा रहिवासी असलेल्या जितेंद्र कुमारने त्याच्या वडिलांच्या इच्छेने इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाला. आयआयटी खरगपूरमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला आणि शिक्षणास सुरुवात केली. मात्र नियतीने त्याच्या आयुष्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवले होते. आयआयटीमध्ये शिकताना त्यांना त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेची जाणीव झाली. लहानपणापासूनच त्याला शाहरुख खान, नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांची नक्कल करायला आवडायची. स्वतःच्या खऱ्या प्रतिभेची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आयआयटीतील 'हिंदी टेक्नोलॉजी ड्रामेटिक सोसायटी'मध्ये प्रवेश घेतला आणि अनेक नाट्य सादरीकरणांमध्ये भाग घेतला.
ट्रेंडिंग
जितेंद्र कुमारने अभिनयाला कशी सुरुवात केली?
एका नाट्य सादरीकरणाच्या वेळी त्याची भेट टीव्हीएफचे क्रिएटिव्ह डायरेक्टर बिस्वापती सरकार यांच्याशी झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातला एक निर्णायक क्षण ठरला. पदवीधर झाल्यानंतर जितेंद्र कुमार यांना एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पगाराची नोकरीही मिळाली होती. पण त्यांनी ती डेस्क जॉब सोडून आपल्या स्वप्नांना प्राधान्य दिले.
‘परमानेंट रूममेट्स’ मध्ये होते जितेंद्र
जितेंद्र कुमारला 2014 मध्ये टीव्हीएफच्या 'परमानेंट रूममेट्स' या वेबसिरीजमध्ये 'प्रतीक' या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले. ही भूमिका त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर 2015 मध्ये त्याने 'टीव्हीएफ पिचर्स'मध्ये 'जितू माहेश्वरी' हे पात्र साकारले आणि रातोरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'टीव्हीएफ बॅचलर्स', 'बिष्ट प्लीज!', 'F.A.T.H.E.R.S.', आणि 'मिस्टर अँड मिसेस' अशा अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केले. 2019 मध्ये, त्याने 'कोटा फॅक्टरी'मध्ये ‘जीतू भैया’ ही आज एक प्रतिष्ठित ठरलेली भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनयासाठी त्यांना भरभरून दाद मिळाली आणि 'शुभ मंगल सावधान', 'चमन बहार', 'जादूगर' अशा अनेक हिंदी चित्रपटांतूनही त्यांना ऑफर्स आल्या. अखेरीस, 'पंचायत'मध्ये अभिषेक त्रिपाठी या मुख्य भूमिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला.
जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती
‘पंचायत’ या वेब सिरीजमधील त्याच्या अभिनयामुळे जितेंद्रला सर्वाधिक मानधन मिळणारा अभिनेता म्हणून ओळख मिळाली. बिझनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार, 'पंचायत'च्या तिसऱ्या सिझनसाठी त्यांनी प्रति एपिसोड 70,000 रुपये मानधन घेतले आणि एकूण 5.6 लाख रुपये कमावले. एबीपी लाइव्हच्या माहितीनुसार, आजपर्यंत त्याने सुमारे 7 कोटी रुपयांची संपत्ती उभारली आहे.
अभिनेता जितेंद्रची संपत्ती
‘कोटा फॅक्टरी’ फेम जितेंद्र कुमारकडे आलिशान महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या माहितीनुसार, त्याच्याकडे 42 लाखांची मिनी कंट्रीमॅन, 88.18 लाखांची मर्सिडीज-बेंझ GLS 350D, 48.43 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर आणि 82.10 लाखांची मर्सिडीज-बेंझ ई-क्लास आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा रवीना टंडनच्या हातावर अभिनेत्याने उलटी केली होती, स्वत:चं सांगितला किस्सा VIDEO