विख्खी, व्याख्या, वुख्खू म्हणजे अशोक सराफ यांच्या धुम धडाका सिनेमाचं शूटींग कोणत्या जिल्ह्यात झालंय?
Dhum Dhadaka Movie : मराठीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा धुम धडाका हा सिनेमा कुठे शूट झाला? याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Continues below advertisement
Dhum Dhadaka Movie
Continues below advertisement
1/10
महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धुम धडाका हा सिनेमा 1985 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
2/10
या सिनेमात मराठीतील दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. हा सिनेमा आजही महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षक आवडीने पाहात असतात.
3/10
अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे या अभिनेत्यांनी या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारले होते.
4/10
याशिवाय शरद तळवळकर, भालचंद्र कुलकर्णी, बिपिन वारती यांनी या सिनेमात साईड रोल याशिवाय शरद तळवळकर, भालचंद्र कुलकर्णी, बिपिन वारती यांनी या सिनेमात साईड रोल केले होते. केले होते.
5/10
निवेदिता सराफ, प्रेमा किरण, सुरेखा-ऐश्वर्या राणे या अभिनेत्रींनीही लीड रोल साकारले होते.
Continues below advertisement
6/10
अशोक सराफ यांचे या सिनेमातील डायलॉग आज देखील प्रेक्षकांच्या मनात आहेत.
7/10
विख्खी, व्याख्या, वुख्खू हा अशोक सराफ यांचा डायलॉग आज देखील प्रेक्षक विसरलेले नाहीत.
8/10
दरम्यान, या सिनेमाचं शूटींग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालंय जाणून घेऊयात...
9/10
धुम धडाका या सिनेमाचं शूटींग कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचे अनेक सीन शूट करण्यात आले होते.
10/10
मराठीतील अनेक जुन्या सिनेमांचं त्या काळी कोल्हापुरात शूटींग व्हायचं. धुम धडका बरोबरचं मराठीतील अनेक सिनेमे कोल्हापुरात शूट करण्यात आले होते.
Published at : 29 Jun 2025 05:24 PM (IST)