"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"
Swara Bhasker on Chhaava : "चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय", असं अभिनेत्री स्वरा भास्करने म्हटलंय.

Swara Bhasker on Chhaava : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा (Chhaava) या सिनेमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेल्या अनन्वित छळ या सिनेमातून दाखवण्यात आलाय. दरम्यान, रिलिज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सिनेमाने 100 कोटींची कमाई देखील केली आहे. अनेकांनी (Chhaava) या सिनेमाचं कौतुक केलंय. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने या सिनेमाबाबत ट्वीटरवरुन भाष्य केलंय.
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses - is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
स्वरा भास्करने ट्वीटमध्ये काय काय म्हटलंय?
स्वरा भास्कर या तिच्या ट्विटमध्ये म्हणते, चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झालेत. पण ते सोडून चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय. गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलंय.
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses - is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
छावाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
छावा हा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलाय तर दिनेश विजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमाला संपूर्ण भारतातून तुफान प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका निभावली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात शिवजयंती अशीही साजरी; 'छावा' सिनेमा मोफत, पारंपारिक पेहरावात प्रेक्षक वाजत गाजत सिनेमागृहात