एक आठवड्यानंतर सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खानचं निधन

Pakistani Actress Ayesha Khan found dead : एक आठवड्यानंतर सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खानचं निधन

Continues below advertisement

Pakistani Actress Ayesha Khan found dead : प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा खान कराचीमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये बुधवार, 18 जून रोजी मृत अवस्थेत सापडल्या. त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या जवळपास एक आठवड्यानंतरच त्यांचा मृतदेह आढळून आला. अभिनेत्रीच्या शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या मृतदेहात सडलेली अवस्था दिसून आली, ज्यावरून स्पष्ट होते की त्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, शेजारी आणि नातेवाईकांकडून माहिती गोळा करत आहेत.

Continues below advertisement

स्वतःच्या अपार्टमेंटमध्ये आढळले शव

पाकिस्तानच्या 76 वर्षीय अभिनेत्री आयशा खान यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण पाकिस्तानी मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. पाकिस्तानमधील स्थानिक मीडियाच्या अहवालानुसार, त्यांचे मृतदेह कराचीच्या गुलशन-ए-इकबाल ब्लॉक 7 येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून त्या घरात एकट्याच राहत होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून तसेच लोकांपासून दूर होत्या.. असेही सांगितले जात आहे की त्यांचा मृत्यू जवळपास एक आठवड्यापूर्वीच झाला होता.

मृत्यू कसा झाला?

मीडिया रिपोर्टनुसार, मृत्यूचे नेमके कारण व वेळ समजण्यासाठी त्यांचा मृतदेह कराचीतील जिन्ना रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यांच्या शेवटच्या दिवसांबाबत माहिती मिळवण्यासाठी शेजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून चौकशी सुरू केली आहे. काही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

आयशा खान कोण होत्या?

अभिनेत्री आयशा खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. त्या पाकिस्तानमधील प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात होत्या. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. त्यांना ‘आखिरी चट्टान’, ‘टीपू सुल्तान: द टायगर लॉर्ड’, ‘दहलीज’, ‘दारारेन’, ‘बोल मेरी मछली’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या, जसे की ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘मुस्कान’ आणि ‘फातिमा’ इत्यादी.

 

 

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मी निर्वस्त्र झाले, ऋषी कपूरची हिरोईन, नेहमी साडीत दिसली, पण एका सीनने धुमाकूळ घातला!

Actress Rambha Daughters Are Beautiful: आईप्रमाणेच सौंदर्याची खाण आहेत, अभिनेत्री रंभाच्या दोन्ही मुली; इंडस्ट्रीत डेब्यू केला तर, कित्येक स्टार किड्सना पाजतील पाणी

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »