एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आला नाही. 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा (Mahayuti) अभूतपूर्व विजय झाला आहे. राज्यभरातील 288 विधानसभा जागांपैकी महायुतीला 236 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. विधानसभेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आला नाही. 

महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या. यामध्ये ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाला मिळून 14 जागाच जिंकता आल्या. महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभा टर्म देखील मिळणार नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे 43 चा कोटा निर्धारित होतो. त्यानूसार महाविकास आघाडी मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल, (तेही एका नावावर सहमती झाल्यास) असं समोर आलं आहे. शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येईल.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार?

राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक 28+1=29 सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही.सत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागतं. मात्र पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे 29 सदस्य असणं गरजेच आहे. सध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही. 

2014 आणि 2019 ला लोकसभेत आणि 2024 ला महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार? 

2014 आणि  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवली होती. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेली संख्या देखील पार करता आली नव्हती. संसदेत लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी 55 जागांची आवश्यकता असते.  2019 आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 55 जागा मिळाल्या नव्हत्या. महाराष्ट्रात देखील यावेळी तशीच स्थिती निर्माण होत असल्याचं  दिसून येतं आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 28  आमदारांचा टप्पा पार करता येत नसल्याचं चित्र आहे.  मविआतील कोणत्याही पक्षाला जर 28 जागा मिळाल्या नाहीत तर  पाच वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार आहे.

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्रचा पुढील मुख्यमंत्री कोण?; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नाव आलं समोर, नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Expelled from Thackeray Camp: उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident : सिमेंटने भरलेली लाॅरी थेट इको व्हॅनवर उलटली; एकाच कुटुंबातील चौघांसह 9 जणांचा जागीच अंत, लग्न करून परत येताना काळाचा घाला
सिमेंटने भरलेली लाॅरी थेट इको व्हॅनवर उलटली; एकाच कुटुंबातील चौघांसह 9 जणांचा जागीच अंत, लग्न करून परत येताना काळाचा घाला
Sudhakar Badgujar: फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रियाSuresh Dhas on Supekar | सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून ३०० कोटी रुपये मागितले, धस यांचा दावाBuldhana Wedding: जूनं ते सोनं, कित्येक वर्षानंतर अवतारले बैलगाडीत बैलाच्या घुंगराच्या नादात वऱ्हाडPalghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Expelled from Thackeray Camp: उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident : सिमेंटने भरलेली लाॅरी थेट इको व्हॅनवर उलटली; एकाच कुटुंबातील चौघांसह 9 जणांचा जागीच अंत, लग्न करून परत येताना काळाचा घाला
सिमेंटने भरलेली लाॅरी थेट इको व्हॅनवर उलटली; एकाच कुटुंबातील चौघांसह 9 जणांचा जागीच अंत, लग्न करून परत येताना काळाचा घाला
Sudhakar Badgujar: फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
YouTuber Jasbir Singh : पाकिस्तानी 'चाखरी' करणाऱ्या गद्दारांची यादी संपता संपेना; आता 'हेरगिरी'आरोपाखाली आणखी एका युट्यूबरला अटक; गद्दार ज्योती मल्होत्राशी संबंध, 11 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स
पाकिस्तानी 'चाखरी' करणाऱ्या गद्दारांची यादी संपता संपेना; आता 'हेरगिरी'आरोपाखाली आणखी एका युट्यूबरला अटक; गद्दार ज्योती मल्होत्राशी संबंध, 11 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स
दारूच्या नशेत पतीनं जाळून घेतल्याचा बनाव केला, शवविच्छेदनात डोक्यावरचा मार दिसला अन् पत्नीचं  बिंग फुटलं
दारूच्या नशेत पतीनं जाळून घेतल्याचा बनाव केला, शवविच्छेदनात डोक्यावरचा मार दिसला अन् पत्नीचं बिंग फुटलं
Kolhapur News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
Yashwant Varma : राहत्या घरात नोटांचा खजिना सापडलेल्या न्यायमूर्तींना तगडा झटका देण्याची तयारी; केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी
राहत्या घरात नोटांचा खजिना सापडलेल्या न्यायमूर्तींना तगडा झटका देण्याची तयारी; केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी
Embed widget
OSZAR »