ट्रेंडिंग
Yavatmal Crime News: भर दिवसा तरुणाला, तर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला संपवलं; दोन हत्येच्या घटनेने यवतमाळ हादरलं!
Yavatmal Crime News: दोन खूनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला आहे. यवतमाळ शहरात वस्तीत भरदिवसा खूनाची (Crime News) घटना घडली. तर दुसरी घटना वडगाव जंगल पोलीस ठाणेअंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली.
Yavatmal Crime News: दोन खूनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला आहे. यवतमाळ शहरात वस्तीत भरदिवसा खूनाची (Crime News) घटना घडली. तर दुसरी घटना वडगाव जंगल पोलीस ठाणेअंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली.
यवतमाळ शहरातील घटनेतील मृतकाचे नाव मनीष शेंद्रे (रा.पाटीपुरा) असून वडगाव (जंगल) येथील घटनेत बेबीबाई दलुराम राठोड (56), असे मृत महिलेचे नाव आहे. यवतमाळ शहरातील चांदणी चौकात 30 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आला. मृतकाच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यातच मनीष शेंद्रे यांचा मृत्यू झाला. कळंब चौक परिसरामध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यामध्ये बंदुकीमधून गोळ्या झाडून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणाशी मृतकाचा संबंध होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस विभागाचे तीन पथक तत्काळ पाठविण्यात आले आहे.
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची केली हत्या
तर दुसऱ्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली. ही घटना वडगाव जंगल पोलीस ठाणे अंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली. वडील आईवर तलवारीने हल्ला करत आहेत, हे पाहून मुलगा आईच्या बचावासाठी धावला. त्याने वडिलांचा प्रतिकार केला असता त्यात आरोपी वडील खाटेवरपडून गंभीर जखमी झाले. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बेबीबाई दलूराम राठोड (56), असे मृत महिलेचे नाव आहे. तर दलुराम गुलाब राठोड (59), असे आरोपीचे नाव आहे. दलुराम हा संशयी प्रवृत्तीचा होता. यातूनच त्याने बेबीबाईसोबत वाद घातला.
दोन हत्येच्या घटनेने यवतमाळ हादरलं!
वाद विकोपाला जाऊन त्याने घरातील तलवार काढून बेबीबाईवर वार केला. आईचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीतील मुलगा संदीप दलुराम राठोड हा तेथे धावून आला. वडलांच्या तावडीतून आईला वाचविण्यासाठी त्याने वडिलांना जोरात धक्का दिला. यात दलुराम घरातील खाटेवर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुसरीकडे बेबीबाईला वर्मी घाव बसल्याने जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र या दोन घटनेने यवतमाळ शहर हादरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या