Beed Crime News : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेविरोधात भाजपची आयटी सेल सक्रीय, तक्रार करताच तत्परतेने गुन्हा दाखल

Beed Crime News :  बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आयटी सेलच्या तक्रारीवरून सायबर विभागाने हा गुन्हा नोंदविला आहे.

Continues below advertisement

Beed Crime News :  बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलाय. भाजपा आयटी सेलचे (BJP IT Cell) प्रदेश सहसंयोजक संभाजी सुर्वे यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने हा गुन्हा नोंदविला आहे. रणजीत कासले याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सोशल मिडियाच्या माध्यमात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार नोंदवली गेली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता बीएनएस नुसार कलम 197, 353(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिणामी रणजीत कासलेच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे बोललं जात आहे . 

Continues below advertisement

दरम्यान, रणजीत कासलेला नुकतेच दिल्लीतून अटक करण्यात आली होती. मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले. दरम्यान दोन दिवसांची ही पोलीस कोठडी काल म्हणजेच सोमवारी (2 जून ) पूर्ण झाली आणि त्यानंतर पुन्हा किल्ला कोर्टात कासलेला हजर केले. लोकप्रतिनिधींची बदनामीप्रकरण तसेच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कासलेला अटक झाली होती. अशातच आता आणखी एका गुन्ह्यांची नोंद झाल्याने बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

बीडसह मुंबईत कासले विरोधात गुन्हे दाखल

दरम्यान, यापूर्वी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारींवरुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक करण्यात आली आहे.  

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात बीड सत्र न्यायालयात आज सुनावणी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज(3 जून ) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे. मागील झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुन्हा याची मागणी केली जाऊ शकते...

तसेच वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज एप्लीकेशनवर त्याच्या वकिलांकडून म्हणणे मांडले जाईल. याबरोबरच विष्णू चाटेला लातूरहून बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे. या संपूर्ण महत्त्वाच्या बाबींवर आज सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकीलांकडून युक्तिवाद होईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »