एक्स्प्लोर

Gold Price: पैसे तयार ठेवा, सोन्याचा भाव कोसळायला सुरुवात; तीन दिवसांत 4000 रुपयांची घसरण, चांदीचा भाव 11 हजारांनी खाली पडला

Gold price fall down: राज्याची सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे भाव घसरले. सोन्याच्या भावात तब्बल तीन दिवसात तीन हजार रुपयाची घसरण तर चांदीच्या भावात 11 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Price & Sliver Rates: गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सोने (Gold Price) व चांदीच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात 4000 हजाराने तर चांदीच्या भावात 11000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने व चांदी (Silver Price) खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी  ग्राहक सोने खरेदी बाबत वेट  अँड वॉच भूमिकेत असल्याच पाहायला मिळत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ध्येय धोरणांमुळे सोने व चांदीच्या भावात घसरण होत असल्याचं सोने व्यापारी यांनी म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा परिणाम म्हणून जळगावच्या बाजारात सोनं हे घसरले असल्याचे मानले जात आहे. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह 91 हजार 260 तर चांदीचा भाव हा 92 हजार 700 असल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसात सोने व चांदीचा भाव घसरल्याने ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा  मिळाला आहे. परंतु, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर प्रतितोळा 55 हजारापर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.  त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे भाव सातत्याने खाली येत आहेत. सोन्याचा प्रतितोळा दर काही दिवसांपूर्वी 96 हजारांवर पोहोचला होता. तेव्हापासूनच तज्ज्ञांनी आगामी काळात सोन्याच्या घरात खूप मोठी घसरण होईल, असे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले असले तरी एरवी झटक्यात वाढणारे सोन्याचे भाव उलट कमी होत आहेत. जगभरातील गुंतवणुकदार सोन्याकडे पारंपरिक आणि सर्वात सेफ गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील सोन्याचा भाव पाहता, गुंतवणुकदारांना सोन्यातील गुंतवणूक सध्याच्या घडीला जोखमीची वाटत असल्याचे दिसत आहे.

सोन्याच्या दरात का घसरण होतेय?

अमेरिकेतली मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या भावात 38 टक्क्यांची घसरण होऊ शकते. सोन्याचे दर घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचं उत्पादन मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. 2024 च्या दुसर्‍या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा 950 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठी 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियानं सोन्याचं उत्पादन वाढवलं आहे. तसेच रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे.

2024 मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी 1,045 टन सोने खरेदी केले. मात्र, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेनुसार, 71% सेंट्रल बँकर्स पुढील वर्षी सोने खरेदी कमी करू शकतात. केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी 1045 टन सोन्याची खरेदी केली होती, त्यांच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका सर्व्हेनुसार 71 सेंट्र्ल बँकांनी सोन्याचा साठा कमी करणे किंवा जितका साठा आहे तितका कायम ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी घटून भाव घसरण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

आनंदाची बातमी! सोन्याचा भाव 55 हजारांपर्यंत खाली येणार?

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : महामार्गावर भरधाव टँकरनं कार उडवली; एकाच घरातील आजोबा, आजी आणि चिमुरड्या नातीचा जागीच अंत, लेकीच्या बातमीनं आई बेशुद्ध पडली
महामार्गावर भरधाव टँकरनं कार उडवली; एकाच घरातील आजोबा, आजी आणि चिमुरड्या नातीचा जागीच अंत, लेकीच्या बातमीनं आई बेशुद्ध पडली
Solapur Crime news: आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं
आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Crime news: पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Asim Munir : ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gopichand Padalkar on Rohit Pawar : मला अडवल्यानंतर दोन महिन्यातच त्यांचं सरकार गेलं, पडळकरांची टीकाMahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special ReportVaishnawi Hagwane : चारित्र्यावर शिंतोडे, मनात ओरखडे; आधी वैष्णवीचा छळ, मग चारित्र्यहनन..Special ReportSanjay Raut Vs Sanjay Shirsat : हॉटेलवरुन आरोप, राजकीय फोडणी; राऊतांचे गंभीर आरोप, शिरसाटांचं प्रत्युत्तर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : महामार्गावर भरधाव टँकरनं कार उडवली; एकाच घरातील आजोबा, आजी आणि चिमुरड्या नातीचा जागीच अंत, लेकीच्या बातमीनं आई बेशुद्ध पडली
महामार्गावर भरधाव टँकरनं कार उडवली; एकाच घरातील आजोबा, आजी आणि चिमुरड्या नातीचा जागीच अंत, लेकीच्या बातमीनं आई बेशुद्ध पडली
Solapur Crime news: आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं
आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Crime news: पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Asim Munir : ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
Pune NDA Passing Out Parade 2025 : रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
Dharashiv News: धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
Crime News : मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
India Vs Pakistan: पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
Embed widget
OSZAR »