एक्स्प्लोर

Pune Crime news: पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्याच्या हडपसर परिसरात एका मुलाने मस्तीखोरपणात हवेत गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात त्याच्या मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेल्याची घटना घडली आहे.

Pune Crime : पुण्याच्या हडपसर (Hadapsar) परिसरात एका मुलाने मस्तीखोरपणात हवेत गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात त्याच्या मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात (Pune News) गुन्हेगारीचे प्रमाण आधीच वाढत असताना, अशा प्रकारची बेजबाबदार मस्ती हा चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पुण्याच्या शांततेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune Crime News) 

पुण्यातील हडपसर परिसरातील सातववाडीकडे जाणाऱ्या कॅनल रोडवर ही घटना घडली. चार तरुण दुचाकीवरून एकत्र प्रवास करत असताना, त्यापैकी एकाने मस्तीच्या नादात पिस्तुल लोड करून हवेत गोळीबार केला. मात्र गोळी हवेत जाण्याऐवजी चुकून त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून आरपार गेली. ही घटना 29 मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली असून, गोळी गावठी पिस्तुलातून झाडली गेली होती. गोळी लागल्यानंतर जखमी तरुणाला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गोळी लागल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) हलवले. 

मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार

ससून रुग्णालयातून मिळालेल्या वैद्यकीय माहितीच्या (MLC) आधारे मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) तपास सुरू केला आणि हा गंभीर प्रकार उघडकीस आला. ससून रुग्णालय, पुणे येथून प्राप्त झालेल्या एमएलसीच्या अनुषंगाने पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी अशी माहिती समोर आली की, जखमी तरुणाचे नाव वैभव श्रावण गवळी (20, व्यवसाय - डिलिव्हरी बॉय, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) असून, तो त्याचा मावस भाऊ सुमित खवळे आणि मित्र बसवराज सुतार यांच्यासोबत 29 मे 2025 रोजी रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पांढरे मळा कॅनल रोड, हडपसर येथे वाढदिवसासाठी निघाले होते. या दरम्यान, सुमित खवळे याने आपल्या जवळ बेकायदेशीररीत्या बाळगलेला गावठी कट्टा मस्तीखोरपणाने बाहेर काढून गोळी झाडली. मात्र, ही गोळी चुकून समोर दुचाकीवर बसलेल्या वैभव गवळीच्या डाव्या खांद्यावर लागली, आणि तो गंभीर जखमी झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Deepak Mankar: दीपक मानकरांनंतर आता मुलावरही गुन्हा दाखल; खोटी कागदपत्र सादर करणं भोवलं, बलात्कार प्रकरणातील कुकडेसोबतच्या संबंधाने वाढल्या अडचणी

Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ; पिस्तूल परवान्यासाठी चक्क पोलिसांची फसवणूक, गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime news: पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Asim Munir : ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
Pune NDA Passing Out Parade 2025 : रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
Dharashiv News: धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anil Kaspate Special Report : आधी वैष्णवीचा छळ, चारित्र्यावर शिंतोडे, मनावर ओरखडे Vaishnavi HagawaneZero Hour Full : वैष्णवीला 'थप्पड' मारली...बस इतनी सी बात? हगवणेंच्या वकीलांचा युक्तीवाद...आणि वाद!Ladki Bahin Yojana Special Report :'लाडकी'चा निधी जोरात वादावादी;तिजोरीवर भार ,लाडकीसाठी निधी पळवला?Beed Mango Farmer : पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी महिलेचा अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime news: पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Asim Munir : ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
ही तर पाकिस्तानसाठी लाल रेषा ते 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न, आम्ही कधीच तडजोड करणार नाही! पाक लष्करप्रमुख भारताला थेट जाहीर इशारा देत काय काय म्हणाले?
Pune NDA Passing Out Parade 2025 : रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणार
Dharashiv News: धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
धाराशिवमध्ये अडीच वर्षाचा चिमुकला खेळताना हौदात पडला; आई तुळजाभवानीच्या मंदिरात धावत गेली पण...
Crime News : मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
India Vs Pakistan: पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
Gokul Chairman : शशिकांत पाटील की नाविद मुश्रीफ? 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला; आज दुपारी लखोटाबंद नाव समोर येणार!
शशिकांत पाटील की नाविद मुश्रीफ? 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला; आज दुपारी लखोटाबंद नाव समोर येणार!
Anushka Sharma : आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
Embed widget
OSZAR »