DC Vs MI IPL 2025: दिल्ली धावचीत

DC Vs MI IPL 2025: काल झालेल्या दोन राजधानी मधील लढतीत आर्थिक राजधानीने राजकीय राजधानीला १९ व्या षटकात धावचीत करून रोमहर्षक विजय पदरात पाडून घेतला...काल झालेला पराभव हा या स्पर्धेतील दिल्ली संघाचा पहिला पराभव...आजच्या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या..१३ वे षटक चालू असताना मुबई संघाच्या तंबूत पारस म्हांबरे,रोहित शर्मा आणि जय वर्धने यांच्यात चर्चा चालू होते...माजी कर्णधार रोहित शर्मा जयवर्धने यांना लेग स्पिनर करण शर्मा याला गोलंदाजी ला आणायचा सल्ला देतो...जयवर्धने हा सल्ला मानतात...आणि पुढच्याच षटकात करण शर्मा स्टब ची विकेट काढतो....त्यानंतर पुढील षटकात राहुल ची विकेट काढतो..त्यानंतर १९ वे षटक चालू असताना सलग दोन चौकार वसूल करणारा आशुतोष २ धावांच्या मोहात धावचीत होतो...नंतर पुढील चेंडूवर कुलदीप धावचीत होतो..आणि त्यानंतर मोहित शर्मा धावचीत होतो ....सलग तीन चेंडूवर धावचीत होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ ...विजयी मार्गावर चाललेली राजधानी मुंबई च्या अचूक चेंडू फेकीमुळे धावचीत होते आणि पहिल्या पराभवाला सामोरे जाते...
नाणेफेक जिंकून दिल्ली संघाने प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारले आणि मुंबई संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले..मुंबई संघाने आक्रमक सुरुवात केली..रोहित शर्मा चांगल्या सुरुवाती नंतर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला..त्यानंतर सूर्यकुमार आणि रिकल्टन यांच्यात ६० धावांची आणि नंतर तिलक आणि नमन यांच्या मध्ये ६२ धावांची भागीदारी झाली.. आज तिलक पुन्हा एकदा उत्तम खेळी करून गेला त्याच्या ५९ धावांच्या खेळीत त्याने ३ षटकार मारले..त्याला नमन ने १७ चेंडूत ३८ धावा काढून साथ दिली..मुंबई संघाने आज एकूण १० षटकार मारले आणि धावसंख्या २०० पार नेली...२०६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्ली संघाला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला...पण नंतर आलेल्या करुण नायर ने खूप दिवसांनी येऊन सुद्धा मुंबई च्या गोलंदाजांना कोणतीही करुणा दाखवली नाही...आज त्याने त्याचा दर्जा सिद्ध केला...आल्या आल्या त्याने जमिनी लगत काही उत्तम ड्राईव्ह मारले...आणि नंतर पावर प्लेचा शेवटचा षटक घेऊन येणाऱ्या बुमरावर त्याने तुफानी हल्ला चढविला...त्याच्या एका चेंडूवर जो लेंथ बॉल होता त्यावर त्याने पिक अप चा फटका खेळून षटकार वसूल केला..त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट वर एक चौकार ...आणि एका लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह वर पुन्हा एक षटकार वसूल करून आपल्यामधील क्रिकेट अजून जिवंत आहे हे दाखविले...त्याचे तंत्र उत्तम असल्यामुळे आणि भरपूर देशांतर्गत क्रिकेट खेळल्या मुळे आज सुद्धा तो सराईतपणे खेळला...४० चेंडूत ८९ धावांची भागीदारी करताना त्याने अभिषेक पोरेल सोबत ११९ धावांची भागीदारी केली... इथ पर्यंत सामना दिल्ली संघाच्या बाजूने होता.... करुण नायर ज्या कुशलतेने खेळत होता तेव्हा त्याला बाद करण्यासाठी एक ड्रिम डिलिव्हरी ची गरज होती...आणि तो चेंडू सॅटनर ने टाकला...उजव्या यष्टीचा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर करुण चकला आणि त्याचा त्रिफळा उध्वस्त झाला...त्याच्या नंतर दिल्ली संघाने हातात आलेला विजय मुबई संघाच्या पदरात टाकला...शेवटच्या ३ षटकात ३९ धावांची गरज असताना आशुतोष १४ चेंडूत १७ धावा काढून खेळत होता. पण १९ व्या षटकात विल जॅक च्या एका अफलातून चेंडूफेकीवर तो धावबाद झाला आणि सामना दिल्ली संघाच्या हातून निसटला...आज सुसाट निघालेल्या राजधानीला ब्रेक लावून मुंबई संघाने आपले आव्हानं कायम राखले..सामानवीरचा बहुमान हा कर्ण शर्मा याला दिला गेला.स्पर्धेच्या मध्यावर सगळ्याच लेग स्पिनर ना गवसलेला सूर स्पर्धेत चुरस निर्माण करेल . मुंबई संघाच्या तंबूतील वातावरणामुळे ते यापुढे चांगली मजल मारतील यात शंका नाही....
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
