Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीना नव्या आठवड्यात सतर्कतेचा इशारा! मोठं नुकसान होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 26 May To 1 June 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 26 May To 1 June 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात जोडीदारा सोबतचे अधिक मजबूत होईल, दोघांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील. प्रेम मिळेल.
करिअर (Career) - या आठवड्यात नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुम्हाला धनलाभ होईल. आणि चिंताजनक विषयांपासून मुक्तता मिळवाल..
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुमच्या आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. सध्याचे वातावरण पाहता कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ टाळा.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेम संबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराच्या अपेक्षा वाढू शकतात, मात्र दोघांमधील समजूतदारपणाही वाढेल.
करिअर (Career) - या आठवड्यात नोकरीच्या क्षेत्रात संघर्ष शक्य आहे. व्यवसायात कठोर परिश्रम होतील. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होईल. बिघडलेले काम पूर्ण होईल. सततच्या अपयशांबद्दल काळजी करू नका.
आर्थिक स्थिती (Wealth) - कोणताही आर्थिक निर्णय घेताना सावधान. कोणत्याही कागदपत्रावर सही करताना दोनदा विचार करा, आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावध राहा.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तेलकट अन्न टाळा आणि शक्य असल्यास घरी बनवलेले अन्न खा. कान दुखण्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो.
ही वाचा:
Weekly Lucky Zodiac 26 May To 1 June 2025: मे महिन्याचा शेवटचा आठवडा 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! शुभ योगांनी करिअर, आर्थिक स्थिती असेल जोरात..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
