Horoscope Today 28 June 2025: आजचा शनिवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने नशीब पालटणार, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 28 June 2025: आजचा शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Continues below advertisement

Horoscope Today 28 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 28 जून 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज थोडी मानसिक अस्थिरता वाढवणारा दिवस असला, तरी तुम्हाला तो काहीतरी नवीन कामे करायला लावणारा निश्चित आहे  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज मनाचा मोकळेपणा म्हणजे काय, हे लोक तुमच्याकडून शिकतील, त्यामुळे तुम्ही सर्वांना हवेहवेसे  वाटाल     

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरी जेवढे कष्ट कराल, त्यामानाने लाभ मात्र कमी मिळणार आहेत   

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो संततीच्या बाबतीत त्यांचे विचार आणि तुमचे विचार यामध्ये तफावत राहणार असल्यामुळे, थोडे तटस्थ धोरण ठेवावे लागेल    

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो अनेक संकल्प कराल आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होणार आहेत    

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज महिला आनंदी राहतील, भरपूर कष्ट कराल आता खालच्या लोकांचे सहकार्य ही उत्तम मिळेल  

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुम्ही स्वतः इतक्या आशावादी आहात की, तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल बरीच कामे साध्य होऊन जातील  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जेथे काम करायला तुम्हाला आवडते, तेथे तुमची हजेरी न लागता नको त्या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल   

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्या कर्तुत्वाला झळावी देणारे ग्रहण असले, तरी कष्टाला सीमा राहणार नाही त्यामुळे थोडे कंटाळून जाल   

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो प्रकृती अस्वस्थ थोडे जाणवेल, विचार थोडे भरकटण्याची ही शक्यता आहे       

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांना त्यांच्या कामाची पावती मिळेल, प्रकृतीच्या दृष्टीने मात्र जपावे लागणार आहे     

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज ज्यांना पाठीचे दुखणे रक्तदाबाचा विकार आहे, त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे, औषध वेळेवर घ्यावे.

हेही वाचा :                          

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »