Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला; आजपासून देवाचे राजोपचार बंद, 24 तास दर्शन सुरु
Ashadhi Wari 2025 : आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद झाली असल्याने आता देव 24 तास दर्शनासाठी उभा असणार आहे. यामुळे मंदिरही 24 तास खुले राहणार असल्याने येणाऱ्या भाविकांना रात्रंदिवस दर्शन घेता येईल.
Continues below advertisement
Ashadhi Wari 2025
Continues below advertisement
1/8
आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद झाली असल्याने आता देव 24 तास दर्शनासाठी उभा असणार आहे. यामुळे मंदिरही 24 तास खुले राहणार असल्याने येणाऱ्या भाविकांना रात्रंदिवस दर्शन घेता येणार आहे.
2/8
काही दिवसांपूर्वी भाविकांना झटपट दर्शन मिळवून देण्यासाठी समितीने सुरू केलेली टोकन दर्शन व्यवस्था आता यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद करण्यात आलेली असल्याचे मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
3/8
यंदाची आषाढी खऱ्या अर्थाने विक्रमी होणार असून आजच देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरचे 14 पत्रा शेड भरून दूर पर्यंत पोहोचली आहे. या गर्दीवरून यंदा आषाढीचे सर्व विक्रम मोडीत निघणार असे चित्र आहे.
4/8
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेले टोकन दर्शन आता गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आषाढी यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद करण्यात आले आहे.
5/8
आज सकाळी 11 वाजता महानैवेद्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सर्व मंदिर समिती सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत देवाच्या पाठीमागे मऊ कापसाचा लोड लावण्यात आला.
Continues below advertisement
6/8
रात्रंदिवस दर्शनाला उभारलेल्या विठुरायाला शेणवटा जाणवू नये यासाठी देवाच्या पाठीशी मऊ कापसाचा लोड लावण्याची परंपरा आहे.
7/8
आज हा लोड लावल्यानंतर भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था खुली झाली आहे.
8/8
विठुरायाप्रमाणेच रुक्मिणी मातेलाही शेणवटा जाणवू नये म्हणून मातेच्या पाठीमागे कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे. चालू परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढीची महापूजा होणार आहे.
Published at : 27 Jun 2025 04:52 PM (IST)