Vasant More Full PC : अजित दादा आता स्वर्गात गेले आहेत, मजा घेतायत,वसंत मोरेंचा खोचक टोला
Vasant More Full PC : अजित दादा आता स्वर्गात गेले आहेत, मजा घेतायत,वसंत मोरेंचा खोचक टोला
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे शिवसैनिक नेते वसंत मोरे यांनी हे पुस्तक चक्क देव्हाऱ्यात ठेवून पूजलं आहे ... “शिवसैनिक म्हणून आम्ही हे पुस्तक नक्कीच वाचणार आहोत, पण खरी गरज ही भाजपच्या लोकांना आहे. मोदींना विश्वगुरु बनवण्याची बीजं शिवसेनेने रोवली.त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे...तर “पुस्तकात राऊत यांच्या तुरुंगातील अनुभव, पत्राचाळ प्रकरणातील बाजू, बाजीराव मोदी ही भावलेली संकल्पना हे सगळं भाजप नेत्यांनी समजून घ्यायला हवं. वाघ, फडणवीस, बावनकुळे यांचं काय मत आहे याला अर्थ नाही, त्यांनी आधी पुस्तक वाचावं.”अशा शब्दात विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे तर “सध्या अजित दादा स्वर्गात आहेत, सत्तेची मजा घेत आहेत, ते पूर्वी नरकात होते.” त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी किंबहुना भाजपच्या नेत्यांनी हे पुस्तक नक्की वाचा असा सल्ला वसंत मोरे यांनी दिला आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
