PM Narendra Modi Speech Pakistan : ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, पाकला इशारा, मोदींचे UNCUT भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नियोजित वेळेनुसार आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी संवाद साधला. त्यामध्ये, भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरवर (Operation sindoor) भाष्य करताना भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम केला. गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्य दलाने दाखवेल्या शौर्याचा मला अभिमान आहे. मी भारतीय सैन्य दलास, त्यांच्या शौर्याला आणि प्रत्येक भारतीयांना सॅल्यूट करतो. देशातील प्रत्येक आई, मुलगी आणि लाडक्या बहिणीला मी सलाम करतो. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना धर्म विचारुन ठार मारले. दहशवाद्याचा (Terrorist) हा विभत्स चेहरा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली होती. आमच्या आया-बहिणीचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं वर्णन केलं. ऑपरेशन सिंदूर हे न्याय
7 मे रोजीची सकाळी जगभरातील लोकांनी परिणाम म्हणून पाहिली. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई दलाने स्ट्राईक केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत एवढा मोठा हल्ला करेल. पण, राष्ट्र सर्वप्रथम आहे म्हणूनच पोलादी निर्णय आपण घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. भारतीय सैन्य दलाने केवळ दहशतवाद्यांची तळ उध्वस्त केली नाहीत, तर त्यांचा इच्छाशक्तीवरही प्रहार केल्याचे मोदींनी सांगितले.
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान निराशेच्या गर्तेत गेला होता. त्यातूनच, पाकिस्तानने आणखी एक चूक केली ती म्हणजे दहशवाद्यांच्या पाठिशी उभे राहिला. दहशवादाविरुद्ध भारताच्या बाजुने उभे राहण्याऐवजी पाकिस्ताने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. भारतातील शाळा, कॉलेज, मंदिर, गुरुद्वारा आणि आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरांनाही लक्ष्य केलं. त्यामुळे, पाकिस्तान जगासमोर उघडा पडला. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा भारताच्या हवाई यंत्रणांपुढे चुराडा झाल्याचं जगाने पाहिलं. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वार करण्याची तयारी सुरू होती. पण भारताने पाकिस्तानच्या छताडात वार केल्याचं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
