Bhaskar Jadhav on Sharad Pawar : पवारांना सोडल्याची चूक मान्य,पण मी नाराज नाही,जाधवांचं स्पष्टीकरण
केली याचा अर्थ आपण नाराज आहोत असा होत नाही असं स्पष्टीकरण आमदार भास्कर जाधवांनी दिलंय. प्रामाणिकपणे बोललो, हे प्रामाणिकपणे घेतलं पाहिजे असं जाधव म्हणाले. पवारांना सोडून चूक केली असं विधान त्यांनी काल केलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता भास्कर जाधवांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार साहेबांची मी साथ सोडली, त्यामुळे मला काहीतरी चुकलंय असं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचं स्पष्टीकरण केलंय. मी ते निर्णय घेतला तो चुकीचा होता. हे स्पष्टपणे मी बोललं की काय? लपूनछपून मी आळा पाडतंय काही बोललं नाहीय. पण याचा अर्थ मला ते आता खंत वाटतंय असं अजिबात नाही. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देताय बरोबरं आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भारायचं त्या स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाहीत. पैसा आणि शक्ती ती चटक त्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत ईडी, सीबीआय, पोलिस हा. तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या वेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी चर्चा केली, मी स्वतःसुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती. प्रत्येकाचा आजार वेगळा होता. मी घुसमटून जाणारा माणूस नाही. मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही. पहिली गोष्ट मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो. हे मी बोललो, मी नाकारणारा नाही. राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं. याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे. घुसमट कसली? आणि माझी घुसमट काय होणार? आणि मी काय घुसमटून चोखला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही. मला कुणीही घुसमट ठेवलेलं नाही. किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय. अशा वेळेला माझं तरी मन तसं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे. ती माझी क्षमता आहे. कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असता मला भीती ना भय. त्यामुळे मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललं म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होतेय असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. पक्षामध्ये आपण नाराज असल्याच्या चर्चा अर्थही नाहीत असं भास्कर




