Beed Sinchan Fraud : सिंचन विहीर नसताना शेतकर्याच्या नावाने पैसे कुणी उचलले? प्रकरण काय?
Beed Sinchan Fraud : सिंचन विहीर नसताना शेतकर्याच्या नावाने पैसे कुणी उचलले? प्रकरण काय?
बीडच्या मस्साजोग येथे शेतात सिंचन विहीर नसताना त्याचे पैसे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व्हे नंबर २५/२ ब मध्ये मिथुन देशमुख यांची ६१ आर इतकी जमीन आहे. मात्र शेतात विहीर नसताना त्यांना खोटी माहिती देत विहिरीसाठी खोटी जिओ टॅगिंग केल्याचे त्यांनी सांगितले.काम न करताच त्याचे ३६ हजार रुपये उचलल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मिथुन देशमुख यांनी केला आहे. ग्रामरोजगार ग्रामसेवक पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या संगणमताने हा प्रकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
