ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, अधिवेशनात आज संविधानावर चर्चा, शिफारसीच्या वीस दिवसानंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही यावरुन भास्कर जाधव आक्रमक
संतोष देशमुख हत्याप्रकरणाची आज बीडमध्ये पहिली सुनावणी.. विशेष सरकारी वकील उज्वल निकमही उसस्थित राहणार, आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार की व्हीसीद्वारे याची उत्सुकता
वादग्रस्त व्हिडीओनंतर स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराने पुन्हा शिवसेनेला डिवचलं...'हम होंगे कंगाल..' गाण्यावर तोडफोडीचा व्हिडीओ केला व्हायरल, माफी मागण्यास नकार
चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर.. कामराकडून सात दिवसांच्या मुदतीची मागणी, आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता.
औरंगजेबाने संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार देहदंड दिला, हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य...श्रीमंत कोकाटेंच्या पुस्तकाचा दिला दाखला...एबीपी माझाशी बोलताना कोकाटेंनी केला दाव्याचा इन्कार...
दौंड शहरालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली ६ ते ७ अर्भकं, गर्भपाताचा प्रकार आहे का, याबाबत तपास सुरू, परिसरात खळबळ..
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरात आज निदर्शने.. पाटण्यातून होणार देशव्यापी निदर्शनाची सुरुवात, सर्व खासदारांना विधेयकाची माहिती देणार सरकार





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

