माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील असा थेट इशाराच दिलाय

Lakshman Hake: ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीतील वाकयुद्ध सुरुच असून गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके चर्चेत आहेत. आंदोलक लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचे सांगत गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व आमदारांनी लक्ष्मण हाकेंवर पलटवार केला. आमदार अमोल मिटकरी यांनी काही शब्दप्रयोग करत हाकेंना लक्ष्य केलं. दरम्यान, आजही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टची चर्चा असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील असा थेट इशाराच दिलाय.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
मला रोज महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे धमक्या मिळू लागल्या असून मी गावगाड्यातील मेंढपाळाचा पोरगा आहे मी अशा धमक्यांना भी घालत नाही मात्र माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. हाके यांना राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून धमकीचे फोन आणि इशारे येऊ लागले असून यासंदर्भात पोलिसांकडूनही गृह विभागाकडे अहवाल गेल्याचे हाके यांनी सांगितले. ते म्हणाले, अजितदादा तुमच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घाला. जर माझ्या केसाला धक्का लागला तर तुम्हाला रस्त्यावर आणू. माझ्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला पवार कुटुंब अजित पवार, रोहित पवार जबाबदार राहतील असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय.
मी गोरगरीब ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असून अर्थ खात्याला गोचीडासारखा चिटकून बसलेला अजित पवार हा ओबीसी समाजाचा निधी देत नसल्याने माझा त्यांच्याशी वाद आहे. मात्र ओबीसी समाजाचा अडवलेला निधी देण्याऐवजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागपूर पासून पंढरपूर पर्यंत ज्या पद्धतीने तिच्या देऊ लागली आहेत ते पाहता माझ्यावर असा हल्ला झाल्यास या संपूर्ण पवार कुटुंब जबाबदार असेल असा इशारा हाके यांनी दिला आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

