एक्स्प्लोर

Girish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?

Girish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?

 

नाशिक : देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्या डोक्याला लोखंडी रॉड  लागल्याने दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर जखमी अवस्थेतच मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले, तेथे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर, महत्त्वाची बैठक असल्याने ते पुढे नाशिककडे (Nashik) रवाना झाले आहेत. दरम्यान, मंत्री महोदयांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांचे कार्यकर्त्यांची काहीवेळ धांदल उडाली होती.  

वरणगाव येथील वीरगती प्राप्त झालेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन आज वरणगाव शहरात आले होते. वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव  होत असताना गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. मात्र, डोक्याचे रक्त थांबत नसल्याने दरम्यान, उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केले. तसेच, काळजी करू नका देश सेवा करीत असतांना अर्जुनला वीर मरण आले याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवाचन महाजन यांनी दिले. 

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागला असतांना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत ते चालत गेले, तिथे हजारो वरणगाव करांच्या उपस्थित मानवंदना दिली, त्यानंतर नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे, असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले.

जळगाव व्हिडीओ

Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जिथे जातील तिथे सगळं संपत- गुलाबराव
Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जिथे जातील तिथे सगळं संपत- गुलाबराव

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवडच्या पावसाचं रौद्ररूप, रस्त्यावरून धावणारी 3-4 वाहनं ओढ्याच्या प्रवाहात ओढली गेली, पहा भयावह Photo
पिंपरी चिंचवडच्या पावसाचं रौद्ररूप, रस्त्यावरून धावणारी 3-4 वाहनं ओढ्याच्या प्रवाहात ओढली गेली, पहा भयावह Photo
Ahmedabad plane crash: एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 च्या घरात; मेडिकल काॅलेजमधील 34 जणांचा बळी
एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 च्या घरात; मेडिकल काॅलेजमधील 34 जणांचा बळी
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
Israel vs Iran: इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्थाSupriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांसोबत जाणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐका...Girish Mahajan : ठाकरे-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?गिरीश महाजन म्हणाले...Ahmedabad Plane Crash:लंडनवारीचं स्वप्न, विमानात भंग;पंड्या आणि जोशी कुटुंबीयांना शोक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पिंपरी चिंचवडच्या पावसाचं रौद्ररूप, रस्त्यावरून धावणारी 3-4 वाहनं ओढ्याच्या प्रवाहात ओढली गेली, पहा भयावह Photo
पिंपरी चिंचवडच्या पावसाचं रौद्ररूप, रस्त्यावरून धावणारी 3-4 वाहनं ओढ्याच्या प्रवाहात ओढली गेली, पहा भयावह Photo
Ahmedabad plane crash: एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 च्या घरात; मेडिकल काॅलेजमधील 34 जणांचा बळी
एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 च्या घरात; मेडिकल काॅलेजमधील 34 जणांचा बळी
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
Israel vs Iran: इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Mumbai Crime: आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था
Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था
Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
Embed widget
OSZAR »