Beed Crime | आईच्या मृत्यूनंतर बापाने गतिमंद मुलीला गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले
बीडमध्ये व्यसनी बापाची गतिमंद मुलीला अमानुष वागणूक, आईच्या मृत्यूनंतर बापाने गतिमंद मुलीला गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय..
एका व्यसनी बापाने स्वत:च्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले. आईच्या मृत्यूनंतर अक्षरशः केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली. पैठणच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सूटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 14 May 2025 :
२२ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे जवान पीके साहू भारतात सुखरूप परत, अटारी वाघा सीमेवरुन साहू मायदेशात
भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या ११ एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख, उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाईटनं टिपलेले फोटो समोर, पाकिस्तानकडूनही कबुली
भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार, जैशचं मुख्यालय,लश्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना एकेक कोटींची मदत..
जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त, एके ४७ रायफली, हातबॉम्ब, काडतुसं हस्तगत, थोड्याच वेळात सैन्याची पत्रकार परिषद
तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट, सीडीएस अनिल चौहान यांच्याकडून राष्ट्रपतींना
ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती सादर





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
