एक्स्प्लोर

Ajit Pawar And Sharad Pawar : AI वरुन चॅट GPT; बैठकीनंतर पवरांमध्ये बंद दाराआड चर्चा? Special Report

Ajit Pawar And Sharad Pawar : AI वरुन चॅट GPT; बैठकीनंतर पवरांमध्ये बंद दाराआड चर्चा? Special Report

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? पवार काका पुतण्याचं मनोमिलन होणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात असे सवाल विचारले जात असतानाच आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार पुण्यात एकत्र आले. निमित्त होतं वसंतदादा साखर संकुलात आयोजित एका बैठकीचं. या बैठकीत दोन्ही पवार एकत्र बसले होते. कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. पण या बैठकीनंतर शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील यांची आणखी एक बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय साखरपेरणी झाली? आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून

पुण्याच्या साखर संकुलात बंद दाराआड चर्चा करणारे हे नेते आहेत शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील.
हे नेते एकत्र येण्याचं औपचारिक कारण होतं कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत चर्चा करणं.
एप्रिल महिन्यात याच विषयावर चर्चा करण्यासाठी याच ठिकाणी दोन्ही नेते एकत्र आले होते. 
त्यानंतर आज पुन्हा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संभाव्य वापराबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी खल केला.
अर्थात, आजच्या भेटीचं कागदोपत्री कारण काहीही असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र वेगळ्याच कारणासाठी या भेटीकडं पाहिलं जात होतं. 
शरद पवार आणि अजित पवारांचा पक्ष एक होणार का, या प्रश्नाची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.
या प्रश्नाचं उत्तर सध्या एआयकडे नाहीच, मात्र स्वतः शरद पवारांकडेही ते नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आलं होतं. 

पुण्याच्या साखर संकुलात एआयच्या वापराबाबतची बैठक पार पडली.
या बैठकीला दोन्ही पवार, जयंत पाटील यांच्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित होते.
मात्र या बैठकीनंतर साखर संकुलात बंद दाराआड दोन्ही पवार आणि जयंत पाटील यांच्यात आणखी एक वेगळी बैठक पार पाडली. 
या बैठकीत नेमकी काय साखरपेरणी झाली, असा प्रश्न त्यामुळं निर्माण झाला. 

पवार काका-पुतणे एकत्र येण्याची चर्चा यापूर्वीही अनेकदा रंगली होती.
मात्र यावेळी ही शक्यता अधिक गडद झाल्याचं चित्र आहे.
असं होणं शक्य नाही, असं आत्मविश्वासानं सांगणारे शरद पवारांचे नेते यावेळी मात्र ताकही फुंकून पित असल्याचं चित्र आहे. 

 

 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Farmers: यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी पैसा खाल्ला, बावनकुळेंचा गंभीर आरोपAnand Paranjape Full PC : संपूर्ण महाराष्ट्राची भाषा मराठीच, मनसेनंतर राष्ट्रवादी देखील आक्रमकPratap Sarnaik : सुनांना सांगितलंय, नातवांशी मराठीतच बोलायचं; सरनाईकांकडून सारवासारव ABP MAJHASpecial Report Kashmir Tourism | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटन पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Farmers: यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
Ukraine Russia War : दीड वर्ष नियोजन, ट्रकमधून ड्रोन पाठवले, एक बटन दाबताचं 40 विमानांचं नुकसान,यूक्रेनकडून थोड्या खर्चात रशियाचं अब्जावधीचं नुकसान 
दीड वर्ष नियोजन, ट्रकमधून ड्रोन पाठवले, यूक्रेननं एक बटन दाबताचं रशियाच्या 40 विमानांचं नुकसान
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
Embed widget
OSZAR »