एक्स्प्लोर

IND Vs ENG 1st Test : हर्षित राणाची निवड, पण वादही पेटला; गौतम गंभीरच्या लाडक्याच्या सिलेक्शनवर माजी खेळाडू BCCI वर भडकला, म्हणाला...

Harshit Rana Selection in Team India : 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

India vs England Test Series Harshit Rana : 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने अचानक वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात समाविष्ट केले आहे. काही वेगवान गोलंदाजांच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता असल्यामुळे हर्षितला संधी मिळाली आहे. तो जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यासारख्या वेगवान गोलंदाजांसह संघात सामील होईल.

23 वर्षीय हर्षित उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही संधी मिळाली. आयपीएल 2025 दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) हा वेगवान गोलंदाज 13 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या. सातत्यपूर्ण अचूकता आणि नियंत्रणासह गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आता इंग्लंडमध्ये संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची यापूर्वी निवड झाली नव्हती. आता असे मानले जात होते की, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या अंशुल कंबोजला संधी मिळेल, पण तसे झाले नाही.

माजी खेळाडू बीसीसीआयवर भडकला 

भारताचा माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांनी अंशुलऐवजी हर्षितची निवड केल्याबद्दल बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, "अंशुल कंबोजला संधी द्यायला हवी होती. हर्षित राणावर एवढं भर देण्याचं कारणच समजत नाही." इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत 'अ' संघाच्या अनधिकृत कसोटी सामन्यात हर्षित राणाने फक्त 1 विकेट घेतला. त्याने बॅटने 16 धावा केल्या. दुसरीकडे, अंशुल कंबोजने दोन सामने खेळले आणि 5 विकेट घेतल्या तसेच एकूण 76 धावा केल्या.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हर्षित राणाची निवड जाहीर होताच सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, हर्षित राणा ही निवड काहींना योग्य वाटली असली तरी माजी क्रिकेटर अंशुल कंबोजच्या नावावरुन वादाचा भडका उडालाय. या सगळ्यात नाव घेतलं जातंय गौतम गंभीरचं. अनेकांचा आरोप आहे की, हर्षित राणा हा गौतम गंभीरचा लाडका असल्यामुळे त्याला संधी मिळाली.

आकाश दीपच्या दुखापतीचा संशय

बीसीसीआयने अद्याप कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्याबद्दल सांगितले नाही. पण, असे मानले जाते की आकाश दीप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन्ही अनधिकृत चार दिवसीय सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. दुखापतीमुळे तो यावर्षी आयपीएलमध्येही जास्त खेळू शकला नाही. आकाशने भारत विरुद्ध भारत 'अ' संघातील अंतर्गत सामन्यात भाग घेतला असला तरी, त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीबद्दल अजूनही प्रश्न आहेत. जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता आणि तंदुरुस्तीची पुष्टी केली आहे. पण, तो सलग सर्व सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ -

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.

हे ही वाचा -

भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार! टी-20 वर्ल्ड कपमध्ये महामुकाबल्याची तारीख ठरली, ICC कडून मोठी घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बीडमध्ये पैशांसाठी पुन्हा अपहरण, मुलगा जिवंत हवा असेल तर आता 50 हजार टाका अन्यथा...
धक्कादायक! बीडमध्ये पैशांसाठी पुन्हा अपहरण, मुलगा जिवंत हवा असेल तर आता 50 हजार टाका अन्यथा...
Nashik Dam Water Release : 'गंगापूर'मधून विसर्ग वाढवला, नाशिकमधील पाच धरणांतून सोडलं पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
'गंगापूर'मधून विसर्ग वाढवला, नाशिकमधील पाच धरणांतून सोडलं पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Paetongtarn Shinawatra: अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधान फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट खूर्ची अन् सरकार सुद्धा धोक्यात!
अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधान फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट खूर्ची अन् सरकार सुद्धा धोक्यात!
Akola Crime News : सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar गटाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलसाठी उमेदवारांना मार्गदर्शन
Ajit Pawar Speech Malegaon : गाफिल राहू नका, रात्र वैऱ्याची,अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
Irak Iran Special Report : भारतानं इस्त्रायलवर दबाव टाकावा, इराणचं आवाहन
Devendra Fadnavis | आळंदीत कुठल्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, फडणवीसांचे आश्वासन
Nitin Gadkari on Yoga : स्वास्थ चांगलं राहण्यासाठी योग विज्ञान आपल्यासाठी खूप उपयोगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! बीडमध्ये पैशांसाठी पुन्हा अपहरण, मुलगा जिवंत हवा असेल तर आता 50 हजार टाका अन्यथा...
धक्कादायक! बीडमध्ये पैशांसाठी पुन्हा अपहरण, मुलगा जिवंत हवा असेल तर आता 50 हजार टाका अन्यथा...
Nashik Dam Water Release : 'गंगापूर'मधून विसर्ग वाढवला, नाशिकमधील पाच धरणांतून सोडलं पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
'गंगापूर'मधून विसर्ग वाढवला, नाशिकमधील पाच धरणांतून सोडलं पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Paetongtarn Shinawatra: अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधान फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट खूर्ची अन् सरकार सुद्धा धोक्यात!
अवघ्या 38 वर्षीय महिला पंतप्रधान फोनवर असे काय बोलल्या की ते लीक होताच थेट खूर्ची अन् सरकार सुद्धा धोक्यात!
Akola Crime News : सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
सोबत दारू प्यायला बसले अन् शा‍ब्दिक चकमक, 'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा; अकोला हादरलं
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची...
मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची...
Sonia Gandhi on Iran-Israel War: इराण आपला जुना दोस्त, अजूनही वेळ गेलेली नाही, इस्त्रायल दुटप्पी, इराणच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे; सोनिया गांधींकडून खडे बोल
इराण आपला जुना दोस्त, अजूनही वेळ गेलेली नाही, इस्त्रायल दुटप्पी, इराणच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे; सोनिया गांधींकडून खडे बोल
Kolhapur News: हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशी
कोल्हापूर : हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशी
Devendra Fadnavis : आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'मी आदेश...'
आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'मी आदेश...'
Embed widget
OSZAR »