एक्स्प्लोर

ICC Test Ranking : WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?

Latest ICC Test Rankings : चॅम्पियन दक्षिण आफ्रिका, पण नंबर-1 खुर्ची अजूनही ऑस्ट्रेलियाकडे! रँकिंगमध्ये भारत-पाकिस्तान कुठं आहेत पहा एकदा...

ICC Test Rankings Update News : क्रिकेटविश्वासाठी आणि विशेषतः दक्षिण आफ्रिकेसाठी एक ऐतिहासिक क्षण.. तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेने अखेर आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत 5 विकेट्सने सामना जिंकला आणि क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन पान लिहिलं. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने फक्त क्रिकेटच खेळलं नाही, तर इतिहास लिहिला. आता 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे चक्र लवकरच सुरू होणार आहे, त्याआधी कसोटीची नवीनतम क्रमवारी जाहीर झाली आहे.

WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! 

2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा उपविजेता ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, ज्याचे सध्या 123 गुण आहेत. 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विजेता दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला आहे. ज्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर आले आहे, ज्याचे आता 114 गुण आहेत, पण रँकिंगमध्ये नंबर-1चं त्याचं स्वप्न अधूरंच राहिलं. इंग्लंड 113 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडिया कुठं?

काही महिन्यांपूर्वीपर्यंत, भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग मालिका गमावल्यानंतर तो चौथ्या स्थानावर आहे. ज्याचे सध्या 105 गुण आहेत. 2021 च्या वर्ल्ड कपचा विजेता न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे आणि श्रीलंका सध्या सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे, वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे, बांगलादेश नवव्या स्थानावर आहे आणि आयर्लंड दहाव्या स्थानावर आहे.

टीम इंडियाच्या नवीन पर्वाची सुरुवात...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 सायकलसाठी भारतीय संघ पुन्हा सज्ज झाला आहे. यंदाची मोहीम थेट इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सुरू होणार आहे, आणि त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्धही कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने नुकतंच भारताच्या कसोटी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.  

2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कोणते संघ खेळतील?

आयसीसी रँकिंगच्या आधारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ पात्र ठरतात. सध्याच्या रँकिंगच्या आधारे, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि बांगलादेश 2025-27 च्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. एकदिवसीय आणि टी-20 मधील संघ क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर, भारत सध्या दोन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ आहे.

हे ही वाचा -

बीसीसीआयची गंगाजळी आटली? कर्मचाऱ्यांच्या 'दैनंदिन भत्त्या'वर कात्री, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
Weather Update:कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट,  विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Landge on Ajit Pawar : मी पैलवान, घाबरत नाही, अंगावर घ्यायची सवय;अजित दादांविरोधात दंड थोपटलेABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा दुपारी 4 च्या हेडलाईन्सTukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पावसाच्या धारेत वारकऱ्यांचा उत्साहDevendra Fadnavis At Dehu : फडणवीसांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन,देहू मंदिरात नयनरम्य सोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
Weather Update:कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट,  विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
Sudhakar Badgujar : भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
पंचायत समिती BDO च्या अंगावरच उधळल्या नोटा; घरकुलासाठी मागितली लाच, संतप्त लाभार्थ्यांचे आंदोलन
पंचायत समिती BDO च्या अंगावरच उधळल्या नोटा; घरकुलासाठी मागितली लाच, संतप्त लाभार्थ्यांचे आंदोलन
Maharashtra Politics: शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
Embed widget
OSZAR »