एक्स्प्लोर
मोगरा फुलला... पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पा 50 लाख फुलांनी सजला; 220 कारागिर 2 दिवस झटले
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

Pune Dagadusheth ganpati mogra festival
1/10

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन
2/10

मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.
3/10

मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली.
4/10

फुलांनी सजलेल्या गाभा-यातील गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते. दगडूशेठ बाप्पांवर आज विविध सुवासिक फुलांची श्रीमंती पाहायला मिळाली.
5/10

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला.
6/10

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
7/10

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल 140 महिला व 80 पुरुष कारागिर करीत होते.
8/10

यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 3000 गुलाब बंडल, 1500 लिली बंडल, 1400 किलो झेंडू, 1500 किलो शेवंती, 1000 किलो गुलछडी, 20 हजार चाफा, 100 किलो गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती.
9/10

मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.
10/10

मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली.
Published at : 17 Apr 2025 09:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
ठाणे
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
