एक्स्प्लोर
Pawar Family: शरद पवार येताच अजितदादा गेटवर गेले; जय पवारांच्या साखरपुड्यासाठी अख्ख पवार कुटुंब एकत्र, पाहा PHOTO
Ajit Pawar-Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा काल (10 एप्रिल) साखरपुडा पार पडला.

Ajit Pawar-Sharad Pawar
1/8

लग्नाच्या गाठी दोन व्यक्ती नव्हे तर दोन कुटुंबाचं नातं बांधून ठेवतात, असं म्हटलं जातं. त्यातही जर ज्या कुटुंबात लग्न ठरलंय त्यांच्याच कुटुंबात काही कारणामुळे कटूता किंवा थोडंस अंतर निर्माण झालं असेल तर तेही अशा सोहळ्यानिमित्ताने साधलं जातं. हे सारं सांगायचं कारण पवार कुटुंबात सुरु झालेली लगीनघाई.
2/8

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा काल (10 एप्रिल) साखरपुडा पार पडला.
3/8

ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवारांच्या घरच्या सूनबाई होणार आहेत.
4/8

नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार पत्नी प्रतिभा पवार आणि जावईबापू सदानंद सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंब जय पवार आणि ऋतुजा पाटीलच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होते.
5/8

शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवारांसह साखरपुडा स्थळी दाखल होताच अजित पवार त्यांना घेण्यासाठी फार्महाऊसच्या गेटवर गेले.
6/8

सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं.
7/8

आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.
8/8

साखरपुड्याचा हा सोहळा राजकीय मंचावरील निर्माण झालेली काहीशी कटूता कमी करुन पवार काका-पुतण्यांच्या कुटुंबातील गोडवा वाढवणार का, हाच खरा प्रश्न आहे.
Published at : 11 Apr 2025 09:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बुलढाणा
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
