अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन 14 जणांचा मृत्यू; 6 जणांना बोलताही येईना, नेमकं काय घडलं?
Amritsar Poisonous Alcohol Case: अमृतसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मजीठा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली.

Amritsar Poisonous Alcohol Case: अमृतसरच्या मजीठा भागात विषारी दारू पिल्याने 14 जणांचा म़त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत 6 जण गंभीर अवस्थेत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृतसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मजीठा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली.
सोमवारी (12 मे) रात्री घडलेल्या या दूर्घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बनावट दारूमुळे झालेल्या या घटनेमध्ये वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. लोकांना काही लक्षणे असली किंवा नसली तरी त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढू नये यासाठी सर्व मदत केली जात असल्याची माहिती अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी एएनआयला सांगितले. याप्रकरणी विषारी दारू विकणाऱ्या पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे.
नक्की घडले काय?
विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अमृतसरच्या मजीठा भागात सोमवारी रात्री घडली. सहा जण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना बोलताही येत नसल्याचं समोर आलंय. विषारी दारू विकणाऱ्या सर्व पुरवठादारांना आणि विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 5 गावांमध्ये विषारी दारूचा परिणाम दिसून आला आहे. या सर्व लोकांनी एकाच पुरवठादाराकडून आणि एकाच ठिकाणाहून दारू खरेदी केली असल्याचा संशय आहे. सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जात आहे.
अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या, 'मजिठामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. आम्हाला काल रात्री कळले, आम्हाला 5 गावांमधून असे अहवाल मिळाले की काल दारू पिणाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. आम्ही आमच्या वैद्यकीय पथकांना तातडीने पाठवले. आमचे वैद्यकीय पथक अजूनही घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. लोकांना काही लक्षणे असली किंवा नसली तरी, आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन जात आहोत जेणेकरून आम्ही त्यांना वाचवू शकू. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार शक्य तितकी सर्व मदत करत आहे. आम्ही खात्री करत आहोत की ही मृतांची संख्या वाढू नये... आम्ही पुरवठादारांना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे..."
#WATCH | Punjab: 14 people dead and 6 hospitalised after allegedly consuming spurious liquor in Amritsar's Majitha
— ANI (@ANI) May 13, 2025
Amritsar Deputy Commissioner Sakshi Sawhney says, " An unfortunate tragedy has happened in Majitha. We got to know yesterday night, we received reports from 5… pic.twitter.com/9IauurxVyq
हेही वाचा:
Mumbai Rain: मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात; आज अन् उद्या मुंबईला यलो अलर्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
