एक्स्प्लोर
PHOTO : मोहाची दारु आणि धान्यांचा नैवेद्य, सातपुड्याच्या डोंगरमाथ्यावरील आदिवासी बांधव करतात वाघाची पूजा
आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून समाजाच्या चालीरीतीमध्ये वन्यप्राणी आणि निसर्गाच महत्वाचे स्थान आहे.

Satpura Tiger Worship
1/10

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात असलेल्या नणंद भावजाईच्या घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते.
2/10

वाघाने गाव-शिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करु नये, गावपाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे.
3/10

मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची पूजा केली जाते
4/10

आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून समाजाच्या चालीरितीमध्ये वन्यप्राणी आणि निसर्गाचं महत्वाचे स्थान आहे.
5/10

जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात वाघदेव मंदिर असून दरवर्षी दोन दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होते.
6/10

या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.
7/10

माघ महिन्यात महाशिवरात्रीपूर्वी वाघदेवतेचे पूजन केले जाते.
8/10

वाघ देवतेचे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहामोगी देवीच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातील देवमोगरा येथे रवाना होतात.
9/10

वाघ देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि मोहाच्या फुलाच्या दारुचा नैवेद्य दाखवला जातो.
10/10

हा नैवेद्य दाखवल्यानंतर ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ होत असून पूजन करुन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे सुरु आहे.
Published at : 13 Feb 2023 11:23 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण