एक्स्प्लोर
Mumbai Pushpak Express Railway Accident: वाऱ्याच्या वेगानं धावणारी ट्रेन, दारावर लटकले प्रवासी ट्रॅकवर पडले; 6 जणांचा मृ्त्यू, अंगावर शहारे आणणारे PHOTO
Mumbai Pushpak Express Railway Accident: मध्य रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाडला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून पाच प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले.

Mumbai Pushpak Express Railway Accident
1/12

चालत्या एक्सप्रेसमधून खाली पडल्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. सर्व प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवानं काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
2/12

चालत्या एक्सप्रेसमधून खाली पडलेल्या प्रवाशांना तातडीनं रुग्णवाहिकेतून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
3/12

मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बरेच प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते.
4/12

दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान ट्रेन आल्यानंतर प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
5/12

पाच ते सहा प्रवासी दीवा-मुंब्रा स्थानकादरम्यान पडले, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी माहिती दिली आहे.
6/12

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी पडल्याची माहिती समोर आली असली तरीसुद्धा यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
7/12

पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली.
8/12

नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
9/12

हे प्रवासी 30-35 वयोगटातील असल्याचंही समजतंय. नेमकं काय घडलं होतं, याबाबती माहिती समोर आली नाही.
10/12

ट्रेनमधून प्रवासी पडल्याच्या अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेले प्रवासी दिसत आहेत.
11/12

या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत.
12/12

अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Published at : 09 Jun 2025 10:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion