एक्स्प्लोर
Tomato Prices: 100 रुपयांचा टोमॅटो 5 रुपयांवर आला, भाव पडल्याने बीडचा बळीराजा हवालदिल झाला
तापमानाचा उच्चांक आणि अवकाळी पावसाच्या इशाऱ्यांमुळे सध्या 100 रुपयांवर असणारा टोमॅटोचा भाव अवघ्या पाच रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झालाय.

tomato price drop
1/5

टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
2/5

बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांनी एक एकर मध्ये दीड लाखांचा खर्च केला होता.
3/5

मात्र ऐन तोडणी वेळी टोमॅटोचे दर कोसळल्याने ढास यांनी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी देखील नेले नाहीत.
4/5

सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटोला गळती लागलीय. यातच टोमॅटोचे दर घसरले असून खत, बियाणे, मजुरी यासाठी केलेला खर्च देखील आता निघत नाहीये.
5/5

दीड लाखांचा खर्च वगळून पीक काढण्यासाठी त्यांना 25 हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
Published at : 13 Apr 2025 04:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र