एक्स्प्लोर
Navratrotsav 2024: तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान, शारदीय नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात
आई राजा उदो उदोच्या गजराने तुळजापूरनगरी दुमदुमली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून भाविक मोठ्या श्रद्धेनं देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत आहे.

tuljabhavani Navratrotsav 2024
1/7

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.
2/7

पहाटेच नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे.
3/7

घटस्थापनेनंतर नऊ दिवस विविध धार्मिक विधी मंदिरात होतील यामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे.
4/7

आई राजा उदो उदो च्या निनादात देवी तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे.
5/7

नवरात्र उत्सवामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत.
6/7

भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून देखील जयत तयारी करण्यात आली आहे.
7/7

पावसात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी उभारण्यात आलेला मंडप, विद्युत रोषणाई, महाद्वारावर देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published at : 03 Oct 2024 08:01 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र