एक्स्प्लोर
Jalgaon Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर धान्याने भरलेला ट्रक आला; जळगावमध्ये मोठा अपघात, PHOTO
Jalgaon Train-Truck Accident: महाराष्ट्रात संपूर्ण होळीचा उत्साह साजरा करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Jalgaon Train-Truck Accident
1/10

महाराष्ट्रात संपूर्ण होळीचा उत्साह साजरा करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
2/10

जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने मोठा अपघात झाला.
3/10

सुदैवाने या अपघातमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
4/10

बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक अडकून पडलेला होता.
5/10

आज सकाळी 4.30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला.
6/10

रेल्वे चालकाने दाखविलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होती.
7/10

अपघात झाला असला तरी जीवितहानी मात्र झाली नसल्याची सध्या माहिती आहे.
8/10

अपघात झालेला ट्रक रेल्वेत अडकून पडला असल्यानं त्याला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
9/10

बोदवडजवळ झालेल्या ट्रक आणि अमरावती एक्सप्रेसच्या अपघातामुळे नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्या आहेत.
10/10

अनेक प्रवासी गाड्या मलकापूर ,नांदुरा, शेगाव, अकोला स्थानकात अडकल्या. सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे.
Published at : 14 Mar 2025 08:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
