एक्स्प्लोर

मोठी बातमी : ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली.

पुणे : राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार (Rain) पाऊस सुरू असून मुंबई, पुण्यासह कोकण आणि मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे. या मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकऱ्यांची पीके वाहून गेली असून अनेकांच्या घरातही पाणी फिरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारातमी (Baramati) मतदारसंघातील अनेक गावात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर, राज्यकर्त्यांनी प्रशासनाला सूचना देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, काही जिल्ह्यात पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी, ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यांना 10 हजार रुपये देणार असल्याची घोषणाच अजित पवारांनी (Ajit pawar) केली.   

अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते इत्यादींचा समावेश आहे. यादरम्यान शेतकरी बांधवांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन देखील अजित पवारांनी नागरिकांना दिलं आहे. 

गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले का, धान्य द्यायला सुरुवात केली आहे. आता, ज्यांच्या ज्यांच्या घरात पावसाने पाणी गेलंय, त्यांना 10-10 हजार रुपये देतोय. लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो, असे म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यासंदर्भात नेमके निकष काय लावले जाणार आहेत किंवा नेमकं कुणाला ही मदत मिळणार आहे यासंदर्भात अद्याप पूर्णपणे माहिती समोर आली असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त लाभार्थींची यादी होण्याची शक्यता आहे. 

बारामतीत निरा कालवा फुटला

बारामती तालुक्यात 3 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये, बारामती-इंदापूर रस्त्यावरील पताकाचा ओढाही तुडुंब भरून वाहिला आहे, हे सर्व एकत्र पुराचे पाणी ढेकळवाडी येथील ओढ्याला मिळते. भवानीनगर, 35 फाटा, विजयनगर परिसरातून येणारे पाणी गावात घुसल्याने गावातील साखरेवाडा व मोठ्या संख्येने गावातील घरेही पाण्यात गेली आहेत. ढेकळवाडी काटेवाडी रस्ता बंद झाला आहे. संततधार पावसाने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज पुन्हा बारामती दौरा केलाय.

हेही वाचा

मोठी बातमी : वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने प्रकरण समोर, मारहाणी प्रकरणी 3 वर्षापूर्वीच गुन्हा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
Eknath Khadse on Devendra Fadnavis : भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...
भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...
कर्णधार शुभमन गिलची 'कसोटी', भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आजपासून सुरु, प्लेइंग 11मध्ये कोणाला संधी? 
कर्णधार शुभमन गिलची 'कसोटी', भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आजपासून सुरु, प्लेइंग 11मध्ये कोणाला संधी? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली
Shiv Sena War | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार पलटवार | 'कमन किल मी'चा मुद्दा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
Eknath Khadse on Devendra Fadnavis : भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...
भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...
कर्णधार शुभमन गिलची 'कसोटी', भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आजपासून सुरु, प्लेइंग 11मध्ये कोणाला संधी? 
कर्णधार शुभमन गिलची 'कसोटी', भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आजपासून सुरु, प्लेइंग 11मध्ये कोणाला संधी? 
Iran-Israel Conflict: ट्रम्प यांनी युद्धापासून दोन आठवडे हात झटकले; इस्त्रायल इराणवर ढीगभर मिसाईल डागूनही आण्विक कार्यक्रम का थांबवू शकत नाही? अमेरिकेचीच मदत का लागणार??
ट्रम्प यांनी युद्धापासून दोन आठवडे हात झटकले; इस्त्रायल इराणवर ढीगभर मिसाईल डागूनही आण्विक कार्यक्रम का थांबवू शकत नाही? अमेरिकेचीच मदत का लागणार??
Devendra Fadnavis and Eknath Khadse :  जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची एन्ट्री, VIP कक्षात बसले, चर्चांना उधाण
जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची एन्ट्री, VIP कक्षात बसले, चर्चांना उधाण
जालन्यात 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा; आणखी 7 तलाठी, 5 तहसील क्लार्कची उचलबांगडी, आतापर्यंत 17 तलाठी निलंबित
जालन्यात 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा; आणखी 7 तलाठी, 5 तहसील क्लार्कची उचलबांगडी, आतापर्यंत 17 तलाठी निलंबित
Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
Embed widget
OSZAR »