एक्स्प्लोर
Akola Accident : अकोल्यातील अपार्टमेंटला भीषण आग; इमारतीच्या बेसमेंटसह अनेक वाहने जळून खाक, अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात
Akola Fire Accident: अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानालगतच्या गंगाधर प्लॉट भागातील अपार्टमेंटला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत इमारतीच्या बेसमेंटसह अनेक वाहने जळून खाक झाल्याचे पुढे आले आहे.

Akola Fire Accident
1/8

अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानालगतच्या गंगाधर प्लॉट भागातील आरती अपार्टमेंटला भीषण आग लागल्याची घटना घडलीय.
2/8

अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या ठिकाणी अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या जवळपास 15 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं.
3/8

या आगीदरम्यान इमारतीतील एक महिला आणि बचाव पथकातील एक जण व्यक्ती जखमी झाला आहे.
4/8

तर जखमी महिलेवर अकोल्याच्या जिल्हा सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
5/8

सकाळी इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. मात्र ही आग कशी लागली आणि आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पुढे आले आहे.
6/8

दरम्यान या आगीत इमारतीचं मोठे नुकसान झालं असून बेसमेंटमधील अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
7/8

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले असून इमारतीतील बचाव कार्य पूर्ण झाले आहे.
8/8

तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सर्व कुटुंब सुखरूप आहे. घटनास्थळावर बचाव पथक, अग्निशमन विभाग आणि पोलीस उपस्थित असून पुढील तपास आता केला जातोय.
Published at : 04 Feb 2025 03:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement