एक्स्प्लोर
Jai Jai Swami Samarth: भक्तगण हतबल, साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार? 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अकल्पित गूढ लीला
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामींची न भूतो न भविष्यति लीला सध्या उलगडत असून जिथे स्वामी अचानक खूप आजारी पडले आहेत.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track
1/8

स्थानावर कमालीची अस्वस्थता आहे. साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार कुणालाच काही कळत नाहीये.
2/8

स्वामींवर कुठल्याच औषधाचा प्रभाव होत नाहीय. भक्तगण हतबल होतात. ही स्वामींची लीला आहे, हे बाळप्पाला जाणवतं आहे, पण यावर उपाय काय हे मात्र त्याला कळत नाहीये.
3/8

तो स्वामींना तशा अवस्थेत पाहू ही शकत नाहीय. यातच बार्शीच्या कुलकर्णी वैद्य आणि त्यांची मुलगी उर्मिला यांची गोष्ट सुरू होते.
4/8

उर्मिला दत्तभक्त आहे, पण घरची गरीबी आहे. तिला विचित्र स्वप्नं पडतात, ज्यात राजवाडा आणि राजा दिसतो. उर्मिला बेचैन होते, आणि दत्तगुरुंना उत्तरं मागते.
5/8

स्वामी उपचारांसाठी कुलकर्णी वैद्याला बोलवायला सांगतात. कपिला वैद्याला स्वामींच्या आजारपणाचा निदान करण्याकरता पैसे मागायला सांगते.
6/8

अक्कलकोटमध्ये स्वामी भक्त श्रीमंत रावसाहेबांच्या घरात अंबरीशसाठी स्थळ बघता आहेत.पत्नी अनुसूयाला मुलासाठी श्रीमंत मुलगी हवी आहे.
7/8

अंबरीश दुसऱ्याच मुलाच्या नादी लागला आहे, पण घरचे तयार नाहीत. अनुसूया उत्तम स्थळ घेऊन येते, पण रावसाहेब स्वामींची परवानगी मागतात.
8/8

स्वामींचे आजारपण, कुलकर्णी वैद्यांना बोलवण्याचे प्रयोजन आणि स्वामी भक्त रावसाहेबांच्या घरची लग्नघाई या तिन्ही कथांचा विलक्षण चकित करणारा घटनाक्रम या आठवड्यात उलगडणार आहे.
Published at : 17 Apr 2025 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सांगली
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
