एक्स्प्लोर
हाती गिटार अन् चेहऱ्यावर स्माईल; अभिनेत्री अदा शर्मा म्हणते कोणतं गाणं वाजवू?
Actress Adah Sharma : अभिनेत्री अदा शर्मा हिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

Actress Adah Sharma
1/10

Actress Adah Sharma : अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करत असते. आज तिने 15 फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या सर्व फोटोंमध्ये तिने हाती गिटार घेतलेला पाहायला मिळत आहे.
2/10

फोटो शेअर करताना अदा शर्माने लिहिलं की, कोणतं गाणं वाजवू? मी सगळे chords शिकले आहे.
3/10

अभिनेत्री अदा शर्मा हिने हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिला बालपणापासूनच अभिनय आणि नृत्यकलेत रुची घेत होती. अदा ही एक कुशल कथ्थक आणि बॅले नृत्यांगना देखील आहे.
4/10

अदा शर्माने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2008 साली आलेल्या 1920 या हॉरर चित्रपटातून केली. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आणि तिला फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन देखील मिळाले.
5/10

पुढे तिने Hasee Toh Phasee, Commando 2, Commando 3, Bypass Road यांसारख्या चित्रपटांत काम केले.
6/10

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तिने आपली छाप पाडली आहे. तेलुगू चित्रपट Heart Attack, S/O Satyamurthy, Kshanam यामधील तिच्या भूमिकांना प्रेक्षक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
7/10

अदा शर्मा सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे. तिच्या आगळ्या-वेगळ्या पोस्ट्स, फिटनेस व्हिडिओज आणि विनोदी कंटेंटमुळे ती तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
8/10

अलीकडेच ती The Kerala Story या वादग्रस्त चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.
9/10

ती स्वतःला सतत नव्या आव्हानांसाठी सिद्ध करत असून अभिनय, नृत्य आणि सामाजिक प्रश्नांवरील मतांमुळे अदा शर्मा आजच्या काळातील महत्त्वाच्या तरुण अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
10/10

सध्या ती तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
Published at : 27 May 2025 05:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
धाराशिव
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
