एक्स्प्लोर
हॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, सौंदर्य पाहून अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्षही झाले होते फिदा; पाहा फोटो
Marilyn Monroe : हॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, सौंदर्य पाहून अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्षही झाले होते फिदा; पाहा फोटो

Marilyn Monroe
1/10

Marilyn Monroe : जेव्हा लोक "ओल्ड हॉलिवूड"चा विचार करतात, तेव्हा त्यांच्या मनात स्त्री कलाकार म्हणून आठवण होते प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरो हिची. अभिनेत्री Marilyn Monroe मोठ्या कष्टातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. मुनरोचे घराचे आयुष्य अस्थिर होते आणि ती अनाथाश्रमात वाढली. मात्र, ती खचली नाही. तिने मोठा संघर्ष करुन करिअर उभा केलं.
2/10

द्वितीय महायुद्धासाठी चालू असलेल्या एका फॅक्टरीत काम करत असताना ती एका एजंटच्या नजरेस पडली आणि नंतर ती मॉडेलिंग प्रोजेक्ट्समध्ये झळकू लागली.
3/10

त्यानंतर हॉलिवूडने तिची दखल घेतली आणि ती Some Like It Hot, The Seven-Year Itch, आणि Gentlemen Prefer Blondes यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.
4/10

"ब्लॉण्ड बॉम्बशेल" हे पात्र साकारण्यापासून ते सौंदर्याच्या एका नव्या युगाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत मर्लिन मुनरो सर्व काही करू शकते, असे वाटायचे. दुर्दैवाने, रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या तिच्या हास्याच्या मागे एक वेदनादायक वास्तव लपलेले होते.
5/10

तिचे आयुष्य खडतर होते – ती मानसिक आजारांशी लढत होती आणि तिचे वैयक्तिक प्रेमप्रकरणे अपयशी ठरली. तिची मानसिक अवस्था अस्थिर असल्याचे सर्वांना ठाऊक होते, तरीसुद्धा ती स्वतःसाठी आणि तिच्या मित्रमैत्रिणींसाठी धैर्याचे प्रतीक ठरली.
6/10

4 ऑगस्ट 1962 रोजी, वयाच्या 36 व्या वर्षी तिचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. आत्महत्येमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यामुळे संपूर्ण जग हादरले.
7/10

तेव्हापासून अनेक कलाकारांनी त्यांच्या कलाकृतींमधून मुनरोला श्रद्धांजली वाहिली. अलीकडेच, मडोन्नाने काही वादग्रस्त छायाचित्रांच्या मालिकेतून मुनरोला आदरांजली अर्पण केली.
8/10

आजही तिच्या आयुष्याबद्दल आणि अचानक झालेल्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही 60 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असतानाही, मर्लिन मुनरो ही आजही इतिहासातील सर्वाधिक गौरवलेली अभिनेत्री मानली जाते.
9/10

अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष John F. Kennedy आणि मर्लिन मनरोचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. तिचं सौंदर्य पाहून John F. Kennedy तिच्यावर फिदा झाले होते.
10/10

जॉन एफ. केनेडी आणि मर्लिन मनरो यांचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा 1962 मध्ये सुरु झाली. हे नाते गुप्त असल्याची अफवा पसरली होती.
Published at : 03 Jun 2025 01:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion