एक्स्प्लोर
Nitesh Rane : कणकवलीत नितेश राणे अन् संदेश पारकर एकाच मंचावर, निवडणुकीच्या रणधुमाळीत अनोखं चित्र, कारण....
Maharashtra Assembly Election 2024 : सिंधुदुर्गमधील कणकवली मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या ठिकाणी नितेश राणे आणि संदेश पारकर यांच्यात लढत होत आहे.

संदेश पारकर नितेश राणे एकाच मंचावर
1/5

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. सिंधुदुर्गमधील कणकवली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितेश राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.
2/5

सिंधुदुर्गच्या देवगड मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणे आणि संदेश पारकर एकाच मंचावर आले होते. यावेळी नितेश राणे यांनी संदेश पारकर आणि मी हा कार्यक्रम नसता तर एकत्र दिसलो नसतो, असं म्हटलं.
3/5

कणकवली विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार देवगड मध्ये रापण महोत्सवात एकत्र दिसून आले. महायुतीचे उमेदवार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर या कार्यक्रमात रापण महोत्सवात एकत्र सून आले.
4/5

दोघांकडून या कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांना शुभेच्या देण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आपलेच मित्र अशी ओळख करून दिली. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन देखील केलं.
5/5

रापण महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना देखील दोघांनी हजेरी लावली.
Published at : 11 Nov 2024 03:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
कोल्हापूर
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
