एक्स्प्लोर
SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 900 रुपयांच्या पार जाणार, स्टॉप लॉस कुठं लावायचा? ब्रोकरेजनं काय म्हटलं?
SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. मे महिन्यात एसबीआयकडून जानेवारी ते मार्च 2025 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया
1/6

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर येत्या काही दिवसांमध्ये 900 रुपयांचा टप्पा पार करु शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांपासून स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी आहे.
2/6

एक्सिस सिक्यूरिटीजनं दिलेल्या सल्ल्यानुसार स्टेट बँक इंडियाचा शेअर 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतो. यामुळं येत्या 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीसाठी शेअर खरेदी करावा, असा देण्यात आला आहे.
3/6

स्टेट बँक इंडियाचा शेअर सध्या 810.75 रुपयांवर आहे. गेल्या महिन्याभरात स्टेट बँकेच्या शेअरमध्ये 39 रुपयांची तेजी दिसून आली आहे. एप्रिल 2025 मध्ये शेअरनं 787 रुपयांच्या स्तरावर इनवर्टेड हेड अँड शोल्डर्स पॅटर्न तोडला आहे. त्यानंतर शेअरची खरेदी वाढली आहे.
4/6

एक्सिस सिक्यूरिटीजच्या अंदाजानुसार बँकेचा शेअर 885-930 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तेजी दर्शवत असून यातून सकारात्मक संकेत मिळतोय. स्टेट बँक ऑफ इंडियाला आरबीआयकडून विशेष दर्जा देण्यात आला आहे. डोमेस्टिक सिस्टमिकली इंपॉर्टंट बँक असा दर्जा दिला आहे. म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक बँक होय.
5/6

स्टेट बँकेचा शेअर खरेदी करायचा असल्यास 815-799 दरम्यान खरेदी करावा असा सल्ला ब्रोकरेज फर्मनं दिला आहे. तर, स्टॉप लॉस 775 रुपये असावा कारण येत्या एक ते तीन महिन्यात बँकेचा शेअर 885 ते 930 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 29 Apr 2025 07:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement