एक्स्प्लोर
HDB Financial IPO च्या GMP मध्ये मोठी वाढ, 2 ब्रोकरेज फर्मकडून Subscribe टॅग, 25 जूनपासून आयपीओ खुला होणार
HDB Financial IPO : एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ 25 जूनपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आयपीओ खुला होण्यापूर्वीच जीएमपीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस
1/6

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ येत्या 25 जूनपासून बोली लावण्यासाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली अपडेट असून ग्रे मार्केट प्रिमियम मध्ये मोठी वाढ झाली आहे. नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ आहे.
2/6

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज हाऊस Centrum आणि स्टेट बँक इंडिया सिक्यूरिटीजनं या आयपीओला सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही ब्रोकरेज फर्म एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आर्थिक स्थितीवर समाधानी आहेत. रिटेल गुंतवणूकदार 25 ते 27 जून दरम्यान आयपीओसाठी बोली लावू शकतात.
3/6

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आयपीओच्या किंमतपट्टा जो निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कालपर्यंत जीएमपी 47.5 रुपयांवर पोहोचला आहे.आज इन्वेस्टरगेनच्या रिपोर्टनुसार जीएमपी 58 रुपयांवर पोहोचला आहे.
4/6

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आयपीओचा किंमतपट्टा 700 ते 740 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एका लॉटमध्ये 20 शेअर ठेवले आहेत. म्हणजेच एका लॉटसाठी 14800 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल. रिटेल गुंतवणूकदार 13 लॉटसाठी बोली लावू शकतात.
5/6

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ 12000 कोटी रुपयांचा आहे. कंपनी आयपीओद्वारे नव्यानं शेअर जारी करणार आहे. तर, काही शेअरची विक्री ऑफर फॉर सेलद्वारे करणार आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 23 Jun 2025 04:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र