एक्स्प्लोर
Shani Margi 2025 : तब्बल 30 वर्षांनी शनीची मार्गी चाल; मीन राशीत 138 दिवस राहून 'या' राशींना करणार खुश, करिअर एकदम सुस्साट चालणार
Shani Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, तब्बल 30 वर्षांनंतर शनी मीन राशीत मार्गी होऊन सरळ चाल चालणार आहे.

Shani Margi 2025
1/8

शनीच्या मार्गी होण्यामुळे काही राशींच्या लोकांच नशीब पालटणार आहे. या राशींना धन, व्यवसाय आणि शिक्षणात शुभ लाभाचा योग जुळून येणार आहे.
2/8

न्यायदेवता शनीला सर्वात क्रूर ग्रह मानतात. कारण शनी प्रत्येक राशींच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत असतात त्यानंतर संक्रमण करतात.
3/8

अशा प्रकारे शनीला एका राशीत पुन्हा येण्यासाठी शनीला जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. शनी मीन राशीतच मार्गी होणार आहे.
4/8

जुलै महिन्यात शनी मीन राशीत मार्गी होणार आहेत. शनीच्या सरळ चालीचा काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
5/8

तूळ राशीसाठी शनीची मार्गी चाल फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद लवकरच संपतील. तुमची अनेक कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला बोनस देखील मिळू शकतो.
6/8

वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. तसेच, या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल. व्यवसायातून चांगला लाभ मिळेल.
7/8

वृश्चिक राशीसाठी शनीचं मार्गी होणं फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन फार सुरळीत चालेल. तसेच , नोकरदार वर्गातील लोकांनाही प्रमोशन मिळू शकतं.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 24 May 2025 09:57 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
रायगड
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
