धक्कादायक! अधर पुस प्रकल्पात 43 जनावरे मृत्यूमुखी; धरणात वीज कोसळल्यामुळे दुर्घटना घडल्याची शक्यता, बळीराजा हवालदिल
Yavatmal News : यवतमाळच्या वेणी अधर पुस प्रकल्पाच्या (Adhar Puss Project) बॅक वॉटरमध्ये 43 पाळीव जनावरे अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.

Yavatmal News : यवतमाळच्या वेणी अधर पुस प्रकल्पाच्या (Adhar Puss Project) बॅक वॉटरमध्ये 43 पाळीव जनावरे अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. धारकान्हा परिसरातील गाय, बैल, म्हैस आणि कालवडी अशी पाळीव जनावरे चरण्यासाठी वेणी अधर पुस प्रकल्पाच्या कॅचमेंट क्षेत्रातील गवताळ भागात गेली होती. सायंकाळी सोसाट्याचे वादळ, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी जनावरे धरणाच्या काठावर उथळ पाण्यात बसली होती. याच सुमारास धरणाच्या पाण्यात वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वीज कोसळून जनावरांचा मृत्यू झाला की अन्य काही कारण?
दरम्यान, वज्राघातामुळे पाण्यात बसलेली जनावरे मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. यातील बरीच जनावरे गाळात फसलेली आहेत. त्यामुळे नेमकी वीज कोसळून या जनावरांचा मृत्यू झाला की यामागे वेगळे कारण आहे? याचा अद्याप खुलासा झालेला नाही. धारकान्हा हे गाव दुर्गम भागात आहे. घटनेची माहिती मिळतात तहसीलदार अभय मस्के घटना स्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना दिलासा देत आहे.
मोहिनी नाईक यांनी केली बाईकवरून नुकसानग्रस्त ग्रामीण भागाची पाहणी
यावतमाळच्या पुसद परिसरात वादळ वाऱ्याने व पावसाने ग्रामीण भागात झालेले मोठे नुकसान झाले. याची माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांना मिळाली असता त्यांनी रात्रीच्या सुमारास बाईकवरून नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उप विभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता, व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व इतर शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याशी फोनद्वारे नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. पुसद मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी तुमच्या भागात काही नुकसान झाले असल्याच तातडीने कळवावे, अशा सूचना दिल्या.
उमरखेडच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला
यवतमाळच्या उमरखेड येथील देवसरकर पेट्रोल पंपावरील कर्मचारी अंकुश बोरकर यांच्यावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एकाने पेट्रोल का टाकत नाही, या कारणाने एका युवकाने गालावर चाकूने हल्ला करून जखमी केले. जखमी युवकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. घटनास्थळा वरून आरोपी पसार झाला असून उमरखेड पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

