Iran Israel War : इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना संपवण्याचा कट, दोनवेळा केला प्रयत्न; इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा खळबळजनक दावा

Iran Israel War: इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोनदा मारण्याचा प्रयत्न केला, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे.

Continues below advertisement

Iran Israel War: इराणसोबतच्या (Iran) तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक मोठा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न केला होता, असे बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, ते ट्रम्प यांना मारू इच्छित होते. त्यांच्यासाठी ट्रम्प हे शत्रू क्रमांक एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प एक निर्णायक नेते आहेत. ट्रम्प यांनी कधीही इराणबरोबर सौम्य करार केले नाहीत. उलट त्यांच्या अणु महत्वाकांक्षांवर थेट आघात केला. त्यांनी कासिम सुलेमानीला ठार केले आणि स्पष्ट केले की, इराणला अण्वस्त्र बनवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेतन्याहू यांचा खुलासा

नेतन्याहूंनी खुलासा केला की, त्यांच्या घरावर देखील एक क्षेपणास्त्र डागण्यात आले होते, ज्यामुळे ते स्वतःही इराणच्या लक्ष्यावर होते. त्यांनी स्वतःला ट्रम्प यांचे कनिष्ठ भागीदार म्हटले, जे इराणच्या अण्वस्त्र शक्तीला थांबवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. देशावर अणु हल्ल्याचा थेट धोका होता. इराणकडे लवकरच अणुबॉम्ब आणि 10,000 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची क्षमता असू शकते. इराणविरोधात करण्यात आलेली लष्करी कारवाई, ज्याला 'ऑपरेशन रायझिंग लायन' असे नाव देण्यात आले आहे. ही इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी कारवायांपैकी एक आहे. "आम्ही केवळ आमच्या सुरक्षेची काळजी घेत नाही, तर संपूर्ण जगाला अणु धोक्यापासून वाचवत आहोत," असेही नेतन्याहू यांनी म्हटले आहे. 

नेतान्याहू यांचा इराणला गंभीर इशारा 

नेतान्याहू यांच्या दाव्यांनंतर इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा बॉम्बहल्ला करून प्रत्युत्तर दिले. तथापि, इस्रायली सैन्याने अनेक क्षेपणास्त्रे रोखली. इराणचा अणु आणि क्षेपणास्त्र धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इस्रायल शक्य ते सर्व पाऊल उचलेल, असे नेतन्याहू म्हणाले आहेत. इराणशी बोलण्याचा काही फायदा नाही आणि आता एकमेव पर्याय म्हणजे कडक प्रत्युत्तर, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं प्लॅन फिस्कटला

Donald Trump :  भारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »