India vs Pakistan War: मोठी बातमी! IMF पाकिस्तानला कर्ज देणार नाही; बेलआउट पॅकेजबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री स्पष्टच बोलले

IMF: आयएमएफ पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या पॅकेजचा आढावा घेईल. पाकिस्तानला दिलेल्या कर्जांच्या पुनरावलोकनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली.

Continues below advertisement

India vs Pakistan War: निव्वळ वल्गना करत छाती बडवणाऱ्या पाकिस्तानला भारताशी वाकड्यात जाणं चांगलेच माहागात पडले आहे. किंबहुना पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan) रसातळाला गेली असताना पाकने भारताशी युद्ध करण्याचे नको ते धाडस केलं आहे. काल (8 मे 2025) संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर भारताने योग्य प्रत्युत्तर देत पाकड्यांचे मानसुभे हवेतच नेस्तनाबूत केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला एका पाठोपाठ जबर दणका देत पुन्हा डिवचू पाहणाऱ्या पाकड्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

Continues below advertisement

अशातच आता पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या पॅकेजचा आढावा घेईल. हे पॅकेज क्लायमेट रेझिलियन्स लोन प्रोग्राम अंतर्गत देण्यात आले आहे. पाकिस्तानला दिलेल्या कर्जांच्या पुनरावलोकनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी ही माहिती दिली आहे. उत्तरात त्यांनी सांगितले की, भारत शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या बोर्ड बैठकीत आपले विचार मांडेल.

"मला खात्री आहे की आमचे कार्यकारी संचालक भारताची बाजू मांडतील"

परराष्ट्र सचिवांनी गुरुवारी सांगितले की, आयएमएफमधील भारताचे कार्यकारी संचालक जागतिक वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत देशाची भूमिका मांडतील. "मला खात्री आहे की आमचे कार्यकारी संचालक भारताची बाजू मांडतील," असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, "बोर्डाचे निर्णय हा एक वेगळा विषय आहे... पण मला वाटते की पाकिस्तानच्या बाबतीत हा मुद्दा त्यांच्यासाठी स्पष्ट असला पाहिजे जे या देशाला वाचवण्यासाठी उदारतेने स्वतःच्या खिशातून पैसे देतात."

परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले की, आयएमएफने पाकिस्तानसाठी मंजूर केलेल्या 24 बेलआउट पॅकेजपैकी अनेकांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.  के.व्ही. सुब्रमण्यम यांना आयएमएफच्या कार्यकारी संचालक पदावरून काढून टाकल्यानंतर, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर सध्या ही जबाबदारी सांभाळत आहेत.

पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर 

 गेल्या 10  वर्षांत, पाकिस्तानला आयएमएफकडून अनेक बेलआउट पॅकेजेस मिळाले आहेत. उदाहरणार्थ, निधीने सप्टेंबर 2024 मध्ये 7 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले, जे या वर्षातच वितरित केले जणार होतं. या 7 अब्ज डॉलर्सपैकी 1 अब्ज डॉलर्स आधीच वितरित केले गेले आहेत. याशिवाय, मार्च 2025 मध्ये आयएमएफने पाकिस्तानला हवामान बदलाशी संबंधित 1.3 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले होते. आयएमएफचे कर्ज सशर्त आहेत आणि कर्ज घेणाऱ्या देशांना त्यांच्या अर्थव्यवस्थेत संरचनात्मक सुधारणा करणे आवश्यक असते. पाकिस्तानला मिळणाऱ्या आयएमएफ निधीबाबत, परराष्ट्र सचिवांनी आरोप केला की आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) सारख्या गटांसह त्यांच्या लष्करी गुप्तचर कारवायांना वित्तपुरवठा करण्यास सक्षम करत आहे.

ओसामा बिन लादेन कुठे सापडला आणि त्याला कोणी शहीद म्हटलं?

ते म्हणाले, "जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून पाकिस्तानची प्रतिष्ठा अनेक घटनांमध्ये रुजलेली आहे... ओसामा बिन लादेन कुठे सापडला आणि त्याला कोणी शहीद म्हटले हे मला तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही.त्यांनी पाकिस्तानच्या सीमेत अजूनही सक्रिय असलेल्या मोठ्या संख्येने दहशतवादी, ज्यात संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेले दहशतवाद्यांचा समावेश आहे, याकडेही लक्ष वेधले. पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना, विशेषतः भारताविरुद्ध, चालना देण्यासाठी वापरली जाऊ शकते, अशा वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव मिस्री यांचे हे विधान आले आहे. सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान, त्यांच्या विस्तारित निधी सुविधा (EFF) द्वारे IMF च्या मदतीवर खूप अवलंबून आहे.

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »