Pushparaj Khot: बळीराजाच्या लेकाची यशाला गवसणी; धाराशिवच्या सटवाईवाडीतील पुष्पराजचं यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश

UPSC Success Story: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील आठशे लोकसंख्या असलेल्या सटवाईवाडी येथील पुष्पराज खोत यांनी यूपीएससी परीक्षेत (UPSC 2024) घवघवीत यश मिळवले.

Continues below advertisement

Pushparaj Khot धाराशिव : आयुष्याच्या प्रवासात लाख संकटे येत असतात, मात्र अशा विपरीत परिस्थितीमध्ये जे सातत्याने प्रयत्न करत ध्येयाकडे वाटचाल करत राहतात विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. असाच काहीसा प्रेरणादाई प्रवास राहिला आहे तो धाराशिवच्या (Dharashiv) सटवाईवाडीतील पुष्पराजचा. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील आठशे लोकसंख्या असलेल्या सटवाईवाडी येथील पुष्पराज खोत यांनी यूपीएससी परीक्षेत (UPSC 2024) घवघवीत यश मिळवले. देशभरात 304वी रँक मिळवत त्यांनी यशाला गवसणी घातलीय. पुष्पराज यांचे वडील शेतकरी असून शेती हाच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र शेती सोबत पुष्पराज यांनी यूपीएससीच्या (UPSC Success Story) परीक्षेचे लक्ष्य ठेवले आणि अथक परिश्रमातून त्यांनी हे यश संपादन केलं आहे. पुष्पराज यांच्या यशाने कुटुंबात आनंद उत्सव साजरा करण्यात येतो आहे.

Continues below advertisement

अथक परिश्रम, सातत्य आणि बळीराजाच्या लेकाची यशाला गवसणी

लहानपणापासून पुष्पराजला कलेक्टर व्हायचंय असे स्वप्न मी त्याला दाखवलं होतं. आणि आज त्याने ते स्वप्न पूर्ण केलंय,  अशा भावना त्यांचे वडील नानासाहेब खोत यांनी व्यक्त केल्या. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नोकरीची गरज असल्याने बँकेत नोकरी केली, शिवाय सध्या कृषी अधिकारी म्हणून काम करतोय. गेल्यावर्षी मुलाखतीपर्यंत जाऊन माझं सिलेक्शन झालं नाही. मात्र यावर्षी 304 रँक मिळाल्याने समाधान वाटतंय, असं पुष्पराज म्हणाले. पुष्पराज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावाजवळच झाले. तर वडील शेतकरी असल्याने शेती हाच कुटुंबाचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत होता. कालांतराने पुष्पराज यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि पुढे आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.अखेर आज त्यांचे स्वप्न खरं झालं असून परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. पुष्पराज सध्या नांदेड मधील धर्माबाद तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून काम करत आहेत.  

हार न मानता पाचव्या प्रयत्नात नक्षलग्रस्त गावातील सचिन बिसेनची यशाला गवसणी 

नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल हाती लागला असून गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा सारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदन असलेल्या सालेकसा येथील सचिन बिसेन ने 688 रँक प्राप्त केली आहे. सचिनने पाचव्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली असून त्याने घरी राहून ऑनलाइन क्लासेस लावून हे यश संपादन केले आहे. तर चार वेळा अपयश आले मात्र कधी खचून न जाता त्याने पाचव्या वेळी पुन्हा नव्या जोमाने परीक्षा दिली. यात त्याला यश मिळाले. तसेच नक्षलदृष्ट्या अतीदुर्गम असलेल्या सालेकसा सारख्या दुर्गम भागातून येत त्यांनी मर्यादित परिस्थितीमध्ये  यश संपादन केले आहे. आणि गोंदिया जिल्हा सारख्या दुर्गम भागातील युवकांना परिस्थिती ही कसीही असो. मात्र, आपण जोमाने अभ्यास केला तर आपण  नक्कीच यश संपादन करू शकतो अशी भूमिका यावेळी सचिनने मांडलीय.

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »